<
समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वार्षिक स्नेहसंमेलन
जळगांव(प्रतिनीधी)- समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा जागर हा संस्कृतीचे नसून विकृतीची आहे, श्रद्धेशी नसून अंधश्रद्धेशी आहे, धर्माशी नसून धर्माधं पणाशीआहे, कारण आम्ही संशोधनवादी आहोत. आम्हाला निकोप सृजनशील भारत घडवायचा आहे. धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०१९-२० जागर वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन दिनांक १७ व १८ फेब्रुवारी २०२० रोजी करण्यात आलेले आहे.
यंदाचे हे वर्ष आमच्या संस्थेचे रौप्य मोहोत्सवी वर्ष आहे, संस्थेच्या मागील २५ वर्षात संस्था ही रोपटं होती आता ती वटवृक्षाकडे वाटचाल करीत आहे. समाजकार्य महाविद्यालय हे २३ वर्षापासुन जळगांव शहारत कार्यरत आहे. विद्यार्थ्यांहित जोपासुन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या व्यवस्थेत समाजकार्य शिक्षणातुन विविध समाजउपयोगी कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचा प्रत्यक्ष सहभाग नोंदविला आहे. आणि त्या अनुषंगाने महाविद्यालयाने २०१५ साली नॅक ला सामोरे जात असतांना प्रथम फेरीत अ मानांकन दर्जा प्राप्त केला, २०१६ ला उमवि परिक्षेत्रात उत्कृष्ठ महाविद्यालय हा सन्मान महाविद्यालयाला मिळाला तसेच समाजकल्याण विभाग जिल्हा परीषदेचा व्यसन मुक्ती कार्य पुरस्कार प्राप्त झाला. उमवि गुणवत्ता सुधार समितीने २०१७ साली अ श्रेणी दर्जा म्हणुन गौरव केला, २०१८ साली शैक्षणिक लेखा परिक्षणात अ श्रेणी प्राप्त महाविद्यालय म्हणुन गौरव करण्यात आला. २०१९ ला महाविद्यालयास ISO9001- 2015 मानांकन प्राप्त झाले.
तसेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान RUSA द्वारे महाविद्यालयाच्या पायाभुत विकासासाठी रुपये २कोटी चे अनुदान मंजुर झाले आहे. म्हणुनच २०१९-२० जागार वार्षिक स्नेहसंमेलन हे आगळे वेगळे आहे.या जागर वार्षिक स्नेहसंमेलन चे उद् घाटन दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता महाविद्यालयात होणार आहे. जागर वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमास शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यशवंत महाजन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. शाम सोनवणे महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनिता चौधरी वर्ग प्रतिनिधी मयूर बहिराम, मानसी मराठे, लीना जगताप हे मंचावर उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसीय जागर वार्षिक स्नेह संमेलनामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन महाविद्यालयात केलेले आहेत. दिनांक १७ फेब्रुवारी रोजी रांगोळी, मेहंदी, प्रश्नमंजुषा, एक मिनिट शो, फॅन्सी ड्रेस, एकपात्री, या स्पर्धांचे आयोजन केले आहे. जागर वार्षिक स्नेहसंमेलनाला अविस्मरणीय करण्यासाठी विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा परिधान करणार आहेत. आणि विद्यार्थिनी हा दिवस साडी डे म्हणुन साजरा करणार आहेत.
दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ०९.३० वाजता एकांकिका, वैयक्तिक नृत्य, जोडी नृत्य , समूह नृत्य, गीत गायन, या स्पर्धेचे आयोजन केले आहे. जागर वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ दिनांक १८ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी साडेचार वाजता संपन्न होणार आहे. पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणुन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव येथील मा. योगेश पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे. या प्रसंगी धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष तथा रावेर-यावल विधानसभा क्षेत्राचे आमदर मा. शिरिषदादा चौधरी हे पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी या संस्थेचे सचिव तथा फैजपूर महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. पी. आर. चौधरी, उपाध्यक्ष मा. सुनील पाटील, मा. संचालक श्री. चंदन अत्तरदे, मा. संचालक डॉ. विनय पाटील, शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. यशवंत महाजन, स्नेहसंमेलन प्रमुख डॉ. शाम सोनवणे, महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुनिता चौधरी, महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी हे पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहणार आहेत.
या दोन दिवशीय वार्षिक स्नेहसंमेलनामधील विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण केले जाईल. सोबतच शैक्षणिक वर्ष २०१९-२० या वर्षातील महाविद्यालयातर्फे विद्यापीठ स्तरीय, विभाग स्तरीय, आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये विशेष निवड, विजेते पद प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक व सन्मान पारितोषिक वितरण समारंभ कार्यक्रमात केला जाणार आहे. तसेच महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची राज्य शासन-प्रशासनात शासकीय/अशासकीय अस्थापनेवर, अद्यौगिक क्षेत्रात, बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविणारे, संशोधन क्षेत्रात आचार्य पदवी प्राप्त, SET परिक्षा ऊतीर्ण अश्या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक पारितोषिक वितरण समारंभात होणार आहे.