Saturday, July 12, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तणावाला करा बाय बाय ! दिवस मजेत घालवा !

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/07/2019
in विशेष
Reading Time: 2 mins read
तणावाला करा बाय बाय ! दिवस मजेत घालवा !
  1. सकाळ
  2. दुपारची वेळ ( आफ्टरनून टाइम )
  3. संध्याकाळ
  4. लेखकाचा परिचय

तणावाला करा बाय बाय ! दिवस मजेत घालवा !शिरीष शरद पाटीलनमस्कार मित्रानो !आज कालची जीवनपद्धती ही अतिशय वेगवान व फास्टफूड कल्चर आहे इथे कुणालाही शांत वेळ मिळत नाही इन्स्टंट results अपेक्षित असतात त्यामुळे साहजिक या शर्यतीमध्ये दमछाक होते व काम पूर्ण न करता आल्यास साहजिक मनावर व शरीरावर ताण येतो .आता तुम्ही म्हणाल कि मग स्ट्रेस घालवण्यासाठी काही उपाय करा ,तणावमुक्ती केंद्रामध्ये किंवा शिबिरामध्ये जा ,पण मित्रांना आपण कामावर आहोत समोर काम पूर्ण करण्याचा प्रचंड डोंगर आहे ,पण मन /शरीर साथ देत नाहीय अशा वेळी हतबल होऊन चालत नाही.तणावमुक्तीच्या काही अत्यंत सोप्या पद्धती असतात ज्यामुळे तुम्ही काही मिनिटामध्ये स्वतःला फ्रेश करू शकता .एखादी गोष्ट करण्यास टाळंटाळ केली तर ते काम pending पडते पण कधीतरी करावेच लागते पण जर दुर्लक्ष जास्त झाले तर मग पुढे ते करण्यासाठी जास्त वेळ लागतो तेंव्हा जसा कबीरांनी म्हटलंय & quot; कल करे सो आज कर आज करे सो अब कि वरंना क्षनमे प्रलय हो जाएगी ” त्यामुळे काम कसे ही असो जेव्न्हाचे तेव्हा केलेले अधिक चांगलेपरंतु जर आपण आपली दिनचर्या व work -style कामाची पद्धत योग्य शिस्तबद्धपणे मांडली तर कमी ताण येईल मी या लेखामध्ये आपण बरोबर कामाला पूरक योग्य दिवस कसा असावा याविषयी चर्चा करणार आहे थोडक्यात ” Precaution इस better than cure ” आज मी आपणास काही सिम्पल टिप्स देणार आहे की ज्या मुळे तुमचा कामाचा दिवस हा सुखकर तणावमुक्त तर होईलच पण एफ्फेक्टिव्ह पण होईल. साधारणपणे आपला दिवस हा चारमध्येविभागाला जातो जसे दिवस

नॉर्मली सर्वांची सकाळची वेळ हि घाईची व घड्याळाशी गप्पा मारत होते मग तुम्ही नोकरदार व्यावसायिक अथवा गृहिणी किंवा अजून कोणत्याही प्रकारचे काम करत असा.कारण कामाला वेळेत सुरुवात झाली नाही तर पुढचा पूर्ण दिवस खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वांची एकाच घाई असते व सर्व जण उशीर झाला की मग वैतागतो ,राग हा आपण राग हा जो समोर येईल त्यावर काढला जातो.या करिता जर आपण वेळेचे सुयोग्य आधीच नियोजन केले तर अशी धांदल उडणार नाही !काय पटतंय ना !चला आपण आपला दिवस चांगला करण्यासाठी काही योग्य दिनचर्या आखू या सकाळची वेळ (Morning Time )

सकाळी 5.30 ला सर्वानी आपल्या दिवसास सुरुवात करावी .एक दिवस आपणास सर्व कामे आटोपून तयार होण्यास किती वेळ लागतो हे घड्याळ लावून पाहावे.साधारण पणे 45 मिनिटे व्यायाम /योगासने यासाठी दिल्यास मन व शरीर प्रसन्न होते व कामास उत्साह येतो.जर आपण देवपूजा करत असाल तर त्यासाठी 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही.काही करत नसल्यास निदान गायत्री मंत्र योग्य रिथम मध्ये म्हणावेत कारण ज्याप्रमाणे ओंकार ध्वनी म्हंटलं जातो आपल्या शरीरामध्ये कंपने व लहरी निर्माण होतात व त्या आपल्या डोक्यातील मेंदूपर्यंत पोचतात व मेंदूला जागृत करतात व चालना देतात.हाच फायदा नमाज पठणाने देखील मिळू शकतो त्यामुळे ,आपल्या स्वतः:साठी काही जुन्या गोष्टी अंगिकारल्यास नुकसान न होता फायदाच होऊ शकतो. असो .जर सध्याची उठण्याची वेळ पुरत नसल्यास 15 ते 20 मिनिटे लवकर उठून ऐनवेळी होणारी गडबड टाळता येते.तसेच घर ते कामाचे ठिकाण यामध्ये ट्रॅफीक जॅम होऊ शकतो यासाठी 15 मिनिटे राखून ठेवावीत मग आपल्याला ट्रॅफीक लागले तरी कामावर पोहोचण्यास उशीर होणार नाही.

सकाळ

कामावर पोहोचल्यावर आपल्याला हे माहित आहे कि “A Simple Smile or U Curve on your Face कॉस्टस Nothing but can gain lot of things” या विधानाप्रमाणे जर आपण सर्वांशी हसतमुख असलो तर आपल्या सहकार्यांना पण आपुलकी वाटते व दिवसाची सुरुवात चांगली होते.वेळेवर आपल्या कामावर पोहचून नुसता उपयोग नाही तर वेळेवर आपल्या कामास सुरुवात झाली पाहिजे नाहीतर लवकर येऊन लॉबी मध्ये सहकार्यांशी सकाळी गप्पा मारल्या तर कुणाला आवडेल ?या सर्व लहान बाबी आहेत पण खूप मॅटर करतात. आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या जागेला आपले श्रद्धास्थान मानावे कारण येथून आपण आपल्या जीवनातील यशाकडे झेप घेत असतो त्यामुळे ज्याप्रमाणे आपण आपले घर स्वच्छ  टापटीप ठेवतो त्याप्रमाणे तुमचे workstation हे स्वच्छ व टापटीप ( clean & Tidy ) असायला हवे. आपण आपले कामाचे ठिकाणी “workstation ” एखादे छोटे इनडोअर ग्रीन प्लांट किंवा स्मायली ठेवू शकता ज्याने प्रस्सन वाटते जेव्हा आपण मंदिरामध्ये किंवा चर्च मध्ये जातो तेव्हा त्या वातावरणात आपल्याला प्रस्सन वाटते कि नाही? व आपण त्याठिकाणी थोडा वेळ व्यतीत केल्यावर एक सकारात्मक एनर्जी घेऊन बाहेर पडतो व स्वतःला चांगल्या विचारामध्ये कामास लागतो .त्याच प्रमाणे जर आपण आपले कामाचे ठिकाण मानले तर अशा ठिकाणी आपणास काम करण्यास एक प्रकारे हुरुप व  उत्साह येईल.आपण जर वास्तु शास्त्र मध्ये वाचले असेल कि प्रत्येक जागा किंवा वास्तु फक्त एकच आशीर्वाद देते तो म्हणजे “तथास्तु ” त्यामुळे आज पासून एक स्वतःसाठी नियम करू यात, तो म्हणजे -काही हीं हो पण मी कुठेही कधी हीं नेगेटिव्ह बोलणार नाही व जर माझा कुणी आप्तेष्ट सहकारी असे नकारात्मक बोलताना आढळला तर त्यास मी पॉसिटीव्ह बोलण्यास प्रवृत्त करेन. “To Do List”: आपण आपले routine काम सुरु करण्यापूर्वी आपल्या कामाच्या ठिकाणी 2 मिनिटे शांत बसावे.या मुळे कामाला एकाग्रता येण्यास मदत होते.आज करावयाच्या अपेक्षित कामाची यादी प्रथम तयार करावी,व त्याचे क्रमवारी देऊन वर्गीकरण करावे .शक्य झाल्यास हि “टू डू लिस्ट ” आपल्या डेस्कटॉप किंवा मोबाइल मध्ये ठेवावी ,यामुळे आपणास कामाचे योग्य तऱ्हेने वेळेनुसार नियोजन करता येईल. कामास सुरुवात करताना ज्याकामासाठी जास्त ऊर्जा लागतो अथवा मेंदूला चालना द्यावी लागते अशी कामे शक्यतो सकाळी पहिल्या सत्रामध्ये करावीत .आपण कामावर येतो तेव्न्हा चांगले फ्रेश असतो व्यवस्थित झोप व शरीराला आराम मिळाला असल्यामुळे जास्त प्रभावीपणे Productive काम होते

दुपारची वेळ ( आफ्टरनून टाइम )

साधारण आपण दुपारी एक ते दोन या वेळामध्ये जेवणासाठी सुट्टी घेणे अपेक्षित आहे .परंतु काही जण स्वतः कामामध्ये एवढे झोकून देतात (किंवा दाखवतात) कि उशिरा तीन चार वाजता जेवतात. माणसाच्या शरीराला कायम ऊर्जेची (energy )आवशक्यता असते व ठराविक वेळी इंधन मिळाले नाही तर मग ते थकते ,व अधिक ताण दिल्यास मग साथ देत नाही ज्यामुळे डोके दुखणे , अशक्तपणा , ऍसिडिटी व तत्सम आजार होऊ लागतात व शरीराचे तंत्र बिघडू शकते त्यामुळे ठराविक वेळी कामास ब्रेक हा दिलाच पाहिजे ,व शांतपणे जेवण करावे जेवताना फाईल पाहणे ,मोबाइल तपासणे किंवा मोबाइल वर बोलणे या कटाक्षाने गोष्टी टाळाव्यात.जर अति महत्वाचा कॉल असेल तर घेऊन त्यांना सांगावे कि मी जेवत आहे, 10 मिनिटांनी करतो ,मला नाही वाटत कोणी याचा खूप issue करेन .कारण परत अजून आपल्याला अजून अर्ध्यापेक्षा जास्त दिवस अजून काम करायचे आहे आणि त्यासाठी शक्ती व ऊर्जा हीं हवीच. ! मला आठवते माझे एक सहकारी मित्र आपल्या ऑफिस मध्ये एका ठराविक वेळेसच रोज न चुकता जेवणाचा डबा खाण्यास कॅन्टीन मध्ये जात असत 4 व काही जण त्यांना पाहिल्यावर आपले घड्याळ लावून घेत ,सांगण्याचा मुद्धा कि काहीही होवो दुपारचे जेवण हे वेळेत झालेच पाहिजे.जेवण झाल्यावर लगेच कामास न लागता थोडा आराम करावा अथवा थोडा बाहेर फेरफटका मारावा आजकाल बहुधा सर्व ठिकाणी AC असतात व आपण कायम त्यामध्ये असतो त्यामुळे थोडे बाहेर जाऊन थोडे ऊन खा ,.पण एकदम बाहेर पडू नका बाहेर आल्यावर थोडे थांबा ,मग बाहेर पडा म्हणजे त्तुम्ही बाहेरच्या वातावरणाशी समरस होता व उन्हाचा त्रास होणार नाही. दुपारच्या वेळेस जेंव्हा आपला कामाचा वेग मंदावतो अथवा कमी होतो अशा वेळेस तुम्ही काही कामे जसे मेल चेक करणे ,फाइल्स हातावेगळे करणे ,फोन कॉल्स करणे अशा गोष्टींना प्राधान्य देऊ शकता .ऑफिस मध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी आपण आपल्या खुर्चीला बसून कधीही चहा नाश्ता करणे टाळावे ,उलट उठून पॅन्टरीपाशी जा किंवा बाहेर जा व चहा एन्जॉय करा.काही कॉर्पोरेट ऑफिस मध्ये या बाबत कडक नियम असतात.मी तुम्हाला एक घडलेला किस्सा सांगतो ,एका ऑफिस मध्ये अधिकारी वर्गाची महत्वाची मीटिंग कॉन्फेरंस रूम मध्ये चालू होती ,मीटिंग मध्ये सर्वजण वेगळ्या विभागातून आलेले होते व सर्व जण लॅपटॉप मोबाईल ovalshape मध्ये बसलेले होते त्या सर्वाना कॉफी चहा बिस्कीट टेबलवरच आले. मीटिंग सुरु होण्याआधी पाण्याचे ग्लास व बॉटल्स पण ठेवले .मीटिंग सुरु असताना एका सदस्यास पाणी हवे होते पण पाण्याची बाटली थोडी लांब होती ती घेताना अंदाज त्याचा चुकला व बाटली मध्यभागी पडली व आधी पाणी पिलेल्या व्यक्तीने बाटलीचे झाकण पूर्ण लावले नव्हते …..!!!आणि पाणी संपूर्ण टेबल वर सांडले ,लॅपटॉप जे इलेक्ट्रिसिटी कॉड ने सेंट्रल युनिट शी कनेक्टेड होते ,त्यांचं शॉर्टसर्किट झाले ,5/6 लॅपटॉप जागीच बंद पडले.एक चूक खूप महागात पडू शकते ,थोडक्यात Workstation वर पाण्याची बाटली सुद्धा ठेवणे टाळावे ,उठून जा तेवढेच चालणे होते.पॅन्ट्री मध्ये इतर सहकारी भेटतात थोडा कामातून विरंगुळा मिळतो .आणि हो बोलते व्हा! मग तो माणूस ओळखीचा असो कि अनोळखी बोलण्याने बरीच कामे होतात न जाणो तुम्हाला तुमच्या एखाद्या समस्येवर तोडगा सापडू शकतो. सध्या आपण एका वेगळ्या कल्चर मध्ये वावरतो, फेसबुक वर 500 मित्र ! पण शेजारच्या इमारतींमधल्य माणसांची ओळख नाही.काय उपयोग ? सर्वाना एक प्रश्न -गेल्या सात दिवसांमध्ये तुम्ही किती मित्रांना भेटलात किंवा बोलतात?. व्हाट्स अँप व फेसबुक सोडून ?मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे त्याला त्याच्या भावना ह्या कुणापाशी तरी व्यक्त करायला आवडते .आपण कामामध्ये खूप मग्न आहेत व काम पूर्ण होत नसल्यामुळे शीण आलाय ? मग जस्ट उठा जागेवरून खिडकी पाशी जा रस्तावर नजर टाका ,बरीच वेगवेगळी माणसे दिसतील ,गाड्या ,wrong side जाणारे अश्या कितीतरी गमती सहज घडत असतात व चुकून हि मीच बरोबर आहे व भांडताना दिसतील तुम्ही हे बघणे एन्जॉय करा बघा फ्रेश वाटेल टेन्शन हे न घेता घालवायचे असते .जर खूप टेन्शन मध्ये आलात तर उचला फोन लावा तुमच्या कॉलेज मधल्या मित्राला ज्याला बऱ्याच दिवसात बोलला नाहीत तो खुश होईल जुन्या आठवणी निघतील व तुम्ही फ्रेश व्हाल आजकाल बऱ्याच वेबसाइट्स किंवा माहितीची पुस्तके असतात ज्या मध्ये कामाच्या ठिकाणी करता येतील अशी काही स्ट्रेचिंगचे प्रकार असतात जे तुम्ही कधीही करू शकता ,लॅपटॉप वर काम असेल तर थोडा वेळ डोळे बंद करा हाताच्या मधल्या बोटाने हलकेसे त्यावर गोल फिरवल्या सारखे करा नक्कीच ताण कमी होतो व फ्रेश वाटते व काम करण्यास अधिक ताकत मिळते

संध्याकाळ

दुपार संपून संध्याकाळ कधी होते हे लक्षात येत नाही व घडाळ्याकडे पहिले कि याची जाणीव होते .यावेळी बहुतांश लोकांना कामाचा ताण हा अधिक जाणवतो .यासाठी आपण दिवसभर केलेल्या कामावर एक नजर टाकावी ,आपल्या सकाळी केलेल्या लिस्ट प्रमाणे झालेल्या कामावर टिकमार्क करा .आता खरी गरज असते ती अति महत्वाचे काम प्राधान्याने करण्याची व ज्याला वेळ कमी लागेल ,जर कितीही प्रयत्न केला तर होणार नसेल तर वेळ घालवण्यात काही अर्थ नाही .नाही म्हणायला शिका (Learn to Say NO) आपण जर एकादी गोष्ट पूर्ण लगेच करू शकत नसू तर नाही म्हणालाय शिकलो पाहिजे उगाच खोटी आश्वासन देऊन आपल्या वरिष्ठाना तात्पुरते खुश करू पण काम नाही झाल्यावर जास्त बोलणी खावी लागतात ,शब्दाने शब्द वाढतो व माणसामाणसामध्ये एक दरी अविश्वास निर्माण होतो .त्याचा परिणाम मानसिक स्वास्थ बिघडण्यास होतो व आपण नकारात्मक होत जातो So Commit that only which You can .

कामावरून वेळेवर घरी परत निघा-Leave the Work on तिने आपण एक गोष्ट ठरवले पाहिजे कि कामाच्या ठिकाणी जास्तीत जास्त कितीवेळ थांबायचे आहे व त्या वेळेस निघालेच पाहिजे कारण जसा जसा दिवस संपतो आपले शरीर थकलेले असते व ते फक्त तुमच्या मूळे पुढे रेटत असते,मग चिडचिड होते मग सर्व गोष्टींचा त्रास होतो . परिस्थितीला सामोरे जाण्यास शिका (Face the Situation ) विक्री क्षेत्र मध्ये काम करणाऱ्या मंडळींना मोबाइलला वर सारखे उपलब्ध राहावे लागते एक तर ग्राहकांना तत्पर सेवा देण्यासाठी व दुसरे वरिष्ठाना रिपोर्टींग साठी ,जर आपण साहेबांच्या फोन ची वाट न पाहता स्वतः हुन प्रोऍक्टिव्हली माहिती पुरवली तर काय फरक पडतो ?त्यामुळे काम संपण्यापूर्वी एक फोन करा व त्यांना हवी ती माहिती द्या म्हणजे घरी जाताना किंवा पोहोचल्यावर तुम्हाला रिपोर्टींग करावे लागणार नाही,बऱ्याचजणांना साहेबांचा फोन घरी घेताना टेन्शन येते मग असे करायला काय हरकत आहे ? दिवस भर केलेल्या कामाचे अवलोकन करा (Self Review Of the Day)कामावरून निघण्यापूर्वी दोन मिनिटे सर्व आवरून शांत बसा,थोडक्यात दिवसभर केलेल्या कामाचे अवलोकन करा जे तुमच्या मनाप्रमाणे झाले त्या बद्दल स्वतः चे अभिनंदन करा ,व जे झाले नाही ते कसे करता आले असते यावर थोडा विचार करा ” थिंक आऊट ऑफ बॉक्स ”  नक्की काही उपाय सापडू शकतो .आणि एक चांगला दिवस गेला याबद्दल देवाचे आभार माना.व हसतमुखाने कामावरून घरी जायला निघा कारण आपले घर आपली आतुरतेने वाट पाहत असते व घरी पोहोचल्यावर तुम्हाला प्रसन्न पाहून बघा सर्व जण पण कसे खुश होतात रात्री आपल्या घरी Late evening or Night at Home

आपण एक गोष्ट नेहमी लक्ष्यात ठेवली पाहिजे कि आपली आपल्या कुटुंबासाठी फक्त पैसे कमावून आणणे इवढीच जबाबदारी नाही तर त्यांना तुमच्या सहवासाची हि तेवढीच गरज असते .घरामध्ये गेल्यावर सगळ्याशी आवर्जून बोलले पाहिजे .तुमच्या मुलीला जर काही शाळेतल्या काही गोष्टी सांगायचे असेल तर तुम्ही इंटरेस्ट घेऊन ऐकायला पाहिजे ,आई वडील तुमच्या दिवसभर वाट पाहत असतात ,तसे आपण काम बायको व आपली मुले यातून त्यांच्या वाट्याला खूप कमी येतो ,त्यांच्याबरोबर बसायला पाहिजे .तुम्ही त्यांच्याबरोबर राहता ,सांभाळता म्हणजे त्यांच्यावर उपकार करत नाही .मला सांगा तुम्ही कधी आई/बाबा जवळ (किंवा आपल्या पत्नी )बसून गप्पा कधी मारल्यात ?त्यांचा हात हातात घेऊन बसा नजरेला नजर द्या खूप वेळ ,हा स्पर्श खूप काही सांगून जाईल ,त्यांचा तुमच्यावरचा विश्वास तुम्हाला एक नवीन बळ व संकटाला सामोरे जाण्याची शक्ती उभारी देईल.असो मला माहिती आहे कि आत्ता तुम्ही खूप इमोशनल झाला आहात,पण हि वस्तुस्थिती आहे व तुम्हाला कुणीतरी ह्याची जाणीव करून द्यायला हवी .रात्रीचे जेवण हे सर्वाना एकत्र घ्यावे ,आजकाल हॉटेल मध्ये गेल्यावरच असे होते पण जर ठरवले तर घरी सुद्धा शक्य आहे .रात्री झोपण्यापूर्वी आपण स्वतःच्या प्रगतीसाठी काय करतो यावर एक छोटी नजर टाका ,मग भले ती शारीरिक संपत्ती असो वा शैक्षणिक विकासासंबंधी ,मला खात्री आहे कि हा विचार आपल्याला आपल्या ध्येयाची आठवण करून देईल व हेच कारण आपल्याला सकाळी लवकर उठण्यास प्रवृत्त करेल व परत एक चांगला दिवस सुरु होईल.

लेखकाचा परिचय

श्री शिरीष शरद पाटील हे पुणे येथे सेल्स स्ट्रॅटेजिस्ट Sales Strategist & Consultant व प्रशिक्षण सल्लागार म्हणून कार्यरत आहेत .त्यांचा 20 वर्षाचा विक्री व्यवस्थापन चा प्रदीर्घ अनुभव आहे .त्यांनी एच.डी.एफ.सी , ,मॅरिको ,विप्रो गोदरेज यांसारख्या नामवंत समूहांबरोबर काम केले आहे. & quot; थ्री डायमेन्शन्स ” हा खास प्रोजेक्ट आहे त्यामार्फत त्यांचं प्रशिक्षण वर्ग घेतले जातात.आपल्या अनुभवाचा लोकांना यशस्वी होण्यासाठी उपयोग व्हायला हवा या हेतूने गेली चार वर्ष स्वतः शिरीष ,सेल्स ट्रैनिंग ,,प्रेझेन्टेशन स्किल्स ,कम्युनिकेशन स्किल्स याविषयावर कार्यशाळा नाममात्र शुल्क आकारून घेतात . तसेच इतर काही महत्वाचे विषय जसे तणाव मुक्ती (Stress Management ) ,New Business Development , यावर खास कार्यशाळा घेतात. अधिक माहितीसाठी आपण संपर्क करू शकता

Contact :Email: shirish.patil@hotmail.com

MOB:+919890333611

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

मानसिक आरोग्या बाबत जागरूकता

Next Post

वर्ल्ड हेड & नेक कॅन्सर डे : जनजागृती अभियानात राज्यातील सव्वीस लाख विद्यार्थ्यांचा सहभाग

Next Post
वर्ल्ड हेड & नेक कॅन्सर डे : जनजागृती अभियानात राज्यातील सव्वीस लाख विद्यार्थ्यांचा सहभाग

वर्ल्ड हेड & नेक कॅन्सर डे : जनजागृती अभियानात राज्यातील सव्वीस लाख विद्यार्थ्यांचा सहभाग

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

“घंटा नांद आंदोलन” प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष; न्यायालयाकडून मुक्तता

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

कासंमपुरा येथे विद्यालयाच्या वतीने पायी दिंडीचे उत्साहात आयोजन

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications