<
जळगांव-(प्रतिनिधी) – जिल्ह्यातील भुसावळ येथे दिनांक 16 फेब्रुवारी 2020 रोजी समता सैनिक दलाची केंद्रीय व राज्य कार्यकारणी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(एस) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मेघराज काटकर सर समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ कदम ,कार्याध्यक्ष संजय बौद्ध, राष्ट्रीय सरचिटणीस मिलींद शामकुरे ,मा. राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद संदशिव, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य धर्मभूषण बागुल, राजाराम मोरे, राज्य अध्यक्ष रितेश अंभोरे, अनुरुद्ध चंदनखेडे सर जळगांव जिल्हाध्यक्ष विजय निकम ,जिल्हा सचिव भाईदास गोलाईत आदी सदस्य व सैनिक उपस्थित होते.
बैठकीत पुढील प्रमाणे ठराव मंजूर करण्यात आले
१) केंद्रीय सदस्य म्हणून काम पाहत असलेले मा. धर्मभूषण बागुलसाहेब यांची राष्ट्रीय संघटक म्हणून निवड करण्यात आली
२) २६ नोव्हेंबर अर्थात संविधान गौरव दिनी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. समता सैनिक दलाचे अधिवेशन दर वर्षी २६ नोव्हेंबर अर्थात संविधान गौरव दिनी घेतले जाणार
३) २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनी समता सैनिक दला तर्फे जिल्हा – तालुका – शहर च्या ठिकाणी पथसचलन करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली जाईल
४) प्रत्येक जिल्हा – तालुका – शहर च्या वतीने जिल्हा मेळावे, बौद्धिक प्रशिक्षण आयोजित करणे.
५) समता सैनिक दलाचा गणवेशात बदल करणे बाबत समिती स्थापन करण्यात येणार आहे.
६) ५ एप्रिल २०२० रोजी जळगांव जिल्हा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
वरील एकूण ६ ठरावावर सविस्तर चर्चा करून सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आले अशी मान्यता राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी दिली. बैठकीला नागपूर,चंद्रपूर, अकोला,रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, धुळे, जळगांव आदी जिल्ह्यातील समता सैनिक दलाचे पदाधिकारी उपस्थित होते.