<
नाशिक, धुळे, अमळनेर, जळगाव आणि मालेगाव येथील जनतेशी साधणार संवाद
आपल्या मधूर आणि प्रेरकवाणीने जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील विविध समस्यांवर मार्गदर्शन करुन अनेकांना सकारात्मक जीवन जगण्याची दिशा देणाया जगप्रसिद्ध मोटिवेशनल स्पिकर ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचे उत्तर महाराष्ट्रात अनेकाविध कार्यक्रमाचे आयोजन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होत आहे.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून जनसामान्यांना जीवन जगतांना येणाया अडचणी, छोट्या-छोट्या गोष्टीतून नकारात्कता कशी वाढीस लागते व त्यावर काय उपाय करता येईल? अशा मुलभूत प्रश्नांवर प्रभावशाली मार्गदर्शन केले आहे. दीदींच्या सहज व चटकन आत्मसात करणाया उपायांनी अनेकांच्या जीवनाची दशा आणि दिशा बदलेली आहे. त्यांना राष्ट्रपतीं महोदयांनी नारिशक्ति या पुरस्काराने सन्मानीत केले आहे. अशा प्रेरक व्यक्तिमत्वाच्या व्याख्यानाचा लाभ उत्तर महाराष्ट्रातील जनतेस मिळणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील कार्यक्रम
शिवानीदीदींच्या विविध कार्यक्रमाचंी माहिती देतांना ब्रह्माकुमारीज् माध्यम समन्वयक डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी सांगितले की, दिदींचे उत्तर महाराष्ट्रातील प्रथम व्याख्यान गुरुवार दि. 5 मार्च, 2020 संध्याकाळी 5.30 ते 7.30 वाजता नाशिक येथील ईदगाह मैदान, गोल्फ क्लब येथे आयोजित केले असून व्याख्यानाचा विषय रिश्तों में मधुरता हा आहे. शुक्रवार दि. 6 मार्च, 2020 रोजी संध्याकाळी 5.30 वाजता तेे 7.30 वाजता धुळे येथील जिल्हा क्रीडा संकुल (स्टेडियम) गोंदूर रोड, देवपूर, येथील व्याख्यानाचा विषय आहे कर्मो की गहन गती, अमळनेर येथे शनिवार दि. 7 मार्च, 2020 संध्याकाळी 5 ते 7 वाजता स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल ग्राऊंड, गलवाडे रोड, व्याख्यानाचा विषय खुशनुमा जीवन जीने की कला हा असेल.जळगांव येथे रवीवार दि. 8 मार्च, 2020 सकाळी 10.30 ते 12.00 वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह, महाबळ कॉलनी, येथे हिलींग द हिलर कार्यक्रमात वैद्यकिय क्षेत्रातील व्यक्तिंसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याच दिवशी दुपारी 12.30 वाजता खानदेश कॉलेज ऑफ एज्युकेशन सोसायटी, जळगावच्या हिरक महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम मु.जे. महाविद्यालयात आयोजित केला जाईल.. संध्याकाळी 5.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल (स्टेडियम) जळगाव येथे सावर्जनिक कार्यक्रम आयोजित केला असून त्याचा विषय खुशी का पासवर्ड हा असेल. दिदींच्या उत्तर महाराष्ट्र दौयाची सांगता मालेगाव जि. नासिक येथील कार्यक्रमाने होणार असून सदर व्याख्यान सोमवार दि. 9 मार्च, 2020 संध्याकाळी रोजी 5.30 ते 7.30 दरम्यान एम.एस.जी. कॉलेज ग्राऊंड, कॅम्प रोड, मालेगांव येथे आयोजित केले आहे. त्याचा विषय वाह जिंदगी, वाह ! हा असेल..
उपस्थितीचे आवाहन
वरील सर्व कार्यक्रमात सर्वांना विनामूल्य व खुला प्रवेश असून दिदींच्या व्याख्यानाची लोकप्रियता लक्षात घेता आसन व्यवस्थेच्या निश्चितीसाठी ब्रह्माकुमारीज्च्या सेवाकेंद्रात अथवा ब्रह्माकुमारीज प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचे आवाहन ब्रह्माकुमारी वासंतीदीदी, नाशिक, ब्रह्माकुमारी रिटादीदी, धुळे, ब्रह्माकुमारी विद्यादीदी, अमळनेर, ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी, जळगाव, ब्रह्माकुमारी शकुंतलादीदी आणि ब्रह्माकुमारी मंगलादीदी, मालेगांव यांनी केले आहे.