<
जळगाव-(प्रतिनिधी) – स्वच्छता आणि पर्यापरण हा मूलभूत मंत्र केंद्रस्थानी ठेवून यावर्षी सार्वजनिक महोत्सव समितीतर्फे शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. 17 फेब्रुवारीला महिला स्कूटर रॅलीने महोत्सवाची सुरुवात होणार असल्याची माहिती रविवारी पद्मालय विभागृहात आयोजित पत्रपरिषदेत देण्यात आली.
शहरात 18 वर्षापासून सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंजी महोत्सव साजरा जात असून महोत्सवात सर्व जाती, धर्म, वंश, पंथ हा भेदाभेद न मिरवता जिल्हातील शिवप्रेमी सहभागी होतात. महोत्सवादरम्यान, विविध स्पर्धा, व्याख्याने, नाटक, किर्तने, क्रिडा स्पर्धा अशा विविध माध्यमातून हा महोत्सव साजरा केला जातो. भव्य शोभा यात्रा हे सर्वासाठी आकर्षण असते.
यावर्षी समितीने अध्यक्षपदी आ. मंगेश चव्हाण यांची तर उपाध्यक्षपदी महापौर भारती सोनवणे यांची सर्वानुमतेे निवड करण्यात आली आहे. तसेच कार्याध्यक्षपदी करीम सालार, सचिवपदी महापालिका शिक्षण सभापती सचिन भिमराव पाटील असतील, असेही यावेळी सांगण्यात आले.
आ. मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून पर्यावरणयुक्त शिवजयंती तर महापौर भारती सोनवणे यांच्या मार्गदर्शनातून स्वच्छतेची संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसेच महामार्गाच्या दुतर्फा एक हजार झाडे लावून एक वर्ष त्याची निगादेखिल महोत्सव समिती घेणार आहे.
असे आहेत कार्यक्रम
17 रोजी दुपारी 4 वा. काव्यरत्नावली चौकातून महिलांची स्कूटर रॅली निघेल. यावेळी महापौर भारती सोनवणे आणि जिजाऊ ब्रिगेडच्या चिता पाटील, राष्ट्रवादी महिला प्रदेश उपाध्यक्ष मंगला पाटील रॅलिचे नेतुत्व करतील. 18 ला सकाळी प्रातिनिधीक स्वरुपात आ. मंगेश चव्हाण यांच्या हस्ते आकाशवाणी चौकात वडाचे झाड लावून वृक्षारोपन होईल. 19 रोजी सकाळी 7.30 वा. छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलापासून शोभायात्रेची सुरुवात होणार असून शोभायात्रेत घोडे, उंट, जिवंत देखावे तसेच विविध कसरतीचे त्यात प्रात्यक्षीत होतील. मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअमपासून नेहरु चौक, टॉवर चौक, चित्रा चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाजवळ सांगता होईल. तसेच तीन दिवसीय व्याख्यानमालेचेही आयोजन करण्यात येणार आहे.
पत्रपरिषदेत कार्याध्यक्ष करीम सालार, सचिव भिमराव पाटील, नगरसेवक कैलास सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. शिवजयंती महोत्सवास शिप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन समितीच्यावतीने सुरेंद्र पाटील, डी.डी.बच्छाव, पुरुषोत्तम चौधरी, मुकंद सपकाळे, अ.भा.छावा प्रदेशध्यक्ष भिमराव मराठे, गफ्फार मलिक, डॉ. प्रताप जाधव, नंदु पाटील, विष्णू भंगाळे, शालिग्राम मालकर, नगरसेवक अनंत जोशी, होरीलसिंग राजपुत, आबा कापसे, मोना तडवी, फईम पटेल, लिलाधर तायडे, चंद्रमणी लभाणे, माजी महापौर नितिन लढ्ढा, शिरीष बर्वे आदींनी केले आहे.