<
जळगांव(प्रतिनीधी)- सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आज शहरात मोठ्या थाटात महिला स्कूटर रँलीचे आयोजन करण्यात आले होते. या महिला स्कूटर रॅलीला शहरातील महिलांनी महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. ५०० स्कूटर व मोटरसायकल वर असलेल्या महिलांबरोबर मुस्लिम महिलांचा सहभाग या रँलीच वैशिष्ट होत. संपूर्ण काव्यरत्नावली चौक व रस्ते भगव्या फेटयानी झगमगत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंगणघाट मधील घटनेचा निषेध करत, श्रद्धांजली वाहण्यात आली. महापौर भारतीताई सोनवणे यांनी यापुढे महिला अत्याचार सहन करणार नाही अशी शपथ सगळ्या महिलांना दिली. यानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर, कैलास सोनवणे, शिवमती सूचिता हाडा, शिवमती भारतीताई सोनवणे, शिवमती सुचिता पाटील, शिवमती मंगलाताई पाटील, या मान्यवरांनी रॅलीला झेंडा दाखवत रॅलीची सुरुवात केली. जय जिजाऊ, जय शिवराय या घोषणांनी सर्व रस्ते दुमदुमले, भगवा फेटा आणि शिवरायांच्या जयजयकाराने जळगाव शहर शिवमय झाले होते. ठिक ठिकाणी या रॅलीचे स्वागत पुष्पवृष्टी ने शहरातील विविध चौकांमध्ये विविध संस्थांनी केले. काव्यरत्नावली चौकातून निघालेली ही रॅली नेहरू चौक, टावर चौक, असा फेरफटका मारत नेरी नाका मार्गे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ येऊन थांबली. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार व फुलांचे फुल अर्पण करण्यात आले. याप्रसंगी सार्वजनिक शिवजयंती समितीचे प्रमुख पुरुषोत्तम चौधरी, सुरेंद्र पाटील, सुरेश भाऊसाहेब पाटील, सुमित पाटील, होरिलसिंग राजपूत, लिलाधर तायडे, भरत कर्डिले, फहीम पटेल, समीर जाधव, चेतन पाटील, संजय सोनवणे आदि लोकांनी आयोजनाचे प्रयत्न केले तर या रॅलीचे नेतृत्व सचिव मनपा शिक्षण सभापती सचिन पाटील यांनी केले . या रॅली मुळे शिवजयंती उत्सवाची दमदार सुरुवात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीने केली आहे. उद्या सकाळी दहा वाजता पर्यावरण पूर्वक शिवजयंती या संकल्पनेची सुरुवात आकाशवाणी चौकात प्रातिनिधिक स्वरूपात वृक्षारोपण करून करण्यात येणार आहे. या प्रसंगी समितीचे अध्यक्ष मंगेश चव्हाण, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, भारतीताई सोनवणे, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्वच्छता व पर्यावरण या संकल्पनेच्या आधारे यावर्षी शिवजयंती साजरी केली जाणार आहे.