<
विध्यार्थ्यानी धरला लेझीमच्या तालावर ठेका
जळगाव-छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती-धर्माला थारा न देता स्वराज्याची स्थापना केली होती. हा जातीय सलोखा कायम राहावा म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयात सर्वसमावेशक शिवजयंती महोत्सव साजरा होत असतो. यावर्षीही दि. १८ ते २० फेब्रुवारीदरम्यान महाविध्यालयात शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व जाती धर्म, पंथ, वंशाचे विध्यार्थी एकत्र येऊन सामाजिक सलोखा व एकात्मतेचे दर्शन घडविणार आहेत. यावेळी मंगळवार ता. १८ रोजी सकाळच्या सत्रात विध्यार्थ्यानी लेझीमच्या तालावर ठेका धरत शिव महोत्सवाला सुरुवात केली, नंतर अभियांत्रिकीच्या सर्व विभागातील विध्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला दुपारच्या सत्रात राज्य नाट्य पारितोषिक विजेते व नाट्यकलावंत प्रा. अमरसिंग राजपूत व आकाशवाणी जळगावचे कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर बोबडे यांचे शिवरायांच्या जीवनावर आधारित व्याख्यान संपन्न झाले. बुधवार ता. १९ रोजी सकाळी १० वाजता बुलेट रॅलीचे आयोजन करण्यात आले असून रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयापासून रॅलीला सुरुवात होणार आहे. याच दिवशी महाविध्यालयात सकाळी ११ वाजता चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर दुपारी शिवजयंती निमित्ताने भव्य शाही मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सवासाठी रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू, रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद खराटे, प्रा. रफिक शेख, प्रा. राज कांकरिया, प्रा. मयूर जाखेटे, प्रा. सोनल पाटील, प्रा. तन्मय भाले, प्रा. हर्षद पाटील, प्रा. हिरालाल सोळुंके, प्रा. भूषण राठी, प्रा. विजय गर्गे, प्रा. अविनाश पांचाळ, प्रा. अंकुश भिश्नुरकर, प्रा. दत्तात्रय चोपडे, प्रा. नितीश सिन्हा, प्रा. रुपाली पाटील, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. प्रफुल्ल देसले, प्रा. शंतनू पवार, प्रा. सौरभ नाईक, प्रा. अमोल जोशी, प्रा. देवानंद तायडे, प्रा. हेमलता वाणी सहकार्य करीत आहे