<
जळगाव-(प्रतिनिधी)-केसीई सोसायटी संचालित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात शिवजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
त्यात गीतगायन , वक्तृत्व , चित्रकला , पोवाडे गायन, अभिवाचन इत्यादी स्पर्धांतुन विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याला उजाळा दिला.
सर्वप्रथम प.वि.पाटील विद्यालयाच्या मुख्या.रेखा पाटील यांच्या हस्ते छात्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.दामोदर धनंजय चौधरी या विद्यार्थ्यांने छ.शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारून “आपण शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्माण करावे , जसे स्वराज्यामध्ये महिलांचे रक्षण होते त्याचप्रमाणे आपण आपल्या आया बहिणींच्या अब्रूचे रक्षण करू अशा शब्दात आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस कोळी आणि चैतन्य बडगुजर यांनी केले तर आभार व्ही. यु.मोरे यांनी मानले.प्रसंगी शाळेचे मुख्या.डी. व्ही.चौधरी , पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे , माधुरी भंगाळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.