<
जळगाव– के.सी.ई. चे आय.एम.आर. येथे क्रिडावेध या वार्षिक खेळ महोत्सवाचा बक्षिस समारंभ संपन्न झाला. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सिंधुताई सपकाळ, के सी ई चे सदस्य डी.टी.पाटील, के सी ई चे प्रशासकीय अधिकारी शशीकांत वडोदकर, डि बी महाजन, आणि आय एम आर च्या संचालक प्रा डॉ शिल्पा बेंडाळे होत्या.
त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना फक्त खेळाचाच नाही तर आयुष्याचा गुरुमंत्र देते..असे सिंधुताई सपकाळ म्हणाल्यात पुढे त्या म्हणाल्या, माफ करायला शिका. या खान्देशातील बहिणाबाई ने मला शिकवले. तिच्या कवितेने मला सांभाळले. पुढे जा पण मागे वळून पहा.. पुढे त्या म्हणाल्या “आज २२ देशात जाऊन आले.. कसे दिसते हे महत्वाचे नाही, आयुष्यातील काटे सहन करा. मुलींनो कपड्यांचे भान ठेवा. तुमच्याकडे बघतांना मादी आठवायला नको.. माय आठवली पाहिजे…काळजाचे घाव ओळखायला शिका..मला स्वतःच्या बाळाची नाळ स्वतःच्या हातांनी तोडताना १६ घाव घालावे लागले.. पण आज २८२ जावाई आहे.. ४५० सुना आहेत.. बाईची जात फार सोशिक. मी माझ्या आयुष्यात पहिले काम केले माझ्या पतीला माफ केले. ज्यांनी हाकलले त्या माहेर सासरला माफ केले. कुणी कुणाचे नसते.. पतीला म्हणाले आता मी तुमची पत्नी नाही होऊ शकत.. पण आई होऊ शकते. आले ना ते सुध्दा माझ्याकडे.. चार राष्टपतींनी मला सन्मानित केले. पण मी कधी ग्रॅन्ड मागितले नाही. जिथे देवाजवळ दिवा जळत असतो तिथे आई मरत नाही.. माझ्याकडे आलेले कुठलेही बाळ मेले नाही. कसे दिसता हे महत्वाचे नाही, कसे आहात ते महत्वाचे आहे.
याप्रसंगी बुध्दीबळ स्पर्धेत अंतरराष्टीय स्तरावर वैभव बडगुजर, क्रिकेट मध्ये प्रद्युम् महाजन, नॅशनल स्पर्धेत साॅफ्ट बाॅल रचना मस्के, अंतरविद्यापिठ पाॅवरलिफ्टींग मध्ये शितल महाजन, ज्युडो स्पर्धेत कशीश भानुशाली, फुटबॉल मध्ये नबील शेख आणि स्वप्नील निरजकर, आंतरविभागिय टेबलटेनीस स्पर्धेत आदित्य चौधरी, महाराष्ट्र स्टेट स्पर्धेत वेदात पाटिल यांना सन्मानित करण्यात आले. तसेच क्रिडावेध मधील सहभागी ४५० विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. याप्रसंगी डायरेक्टर प्रा डॉ शिल्पा बेंडाळे यांनी मनोगत व्यक्त केले. सिंधुताई सपकाळ यांची ओळख डॉ शमा सराफ यांनी करुन दिली. बक्षिस समारंभाचे सुत्रसंचलन आणि आभार फिजीकल डायरेक्टर प्रा निलीमा पाटील यांनी मानले.