<
जळगाव-केसीई सोसायटी संचालित शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात “आशय विश्लेषण” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे तर प्रमुख पाहुणे म्हणून उच्चशिक्षण विभाग जळगावचे सहसंचालक डॉ. सतीश देशपांडे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. लता मोरे डॉ. एस. टी. भुकन अभय युवा बी.एड. कॉलेज धुळे चे प्राचार्य डॉ.वाय.एच. सनेर व मू. जे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एन. भारंबे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. राणे यांनी केले. सकाळ तसेच दुपारच्या सत्रात आर.सी शिंगाणे, दीपक बाविस्कर ,शिरपूर,प्रा.डॉ. रंजना सोनवणे, प्रा.डॉ.सुनीता नेमाडे, प्रा. पंकज पाटील, प्रा. डॉ. स्वाती चव्हाण, प्रा. डॉ. जयश्री पाटील, प्रा. डॉ. शैलेजा भंगाळे, प्रवीण कोल्हे प्रा. डॉ. कुंदा बाविस्कर, प्रा.डॉ. अंजली बन्नापुरे, प्रा. केतन चौधरी, प्रा निलेश जोशी यांनी सादरीकरण करीत उपस्थिती दर्शवली. मराठी या विषयासाठी खिरोदा येथील डॉ. प्रतिभा सूर्यवंशी, हिंदी या विषयासाठी शैलेजा भंगाळे यांनी सादरीकरण केले . ईपीसीच्या सर्व सेशन करिता प्राचार्य डॉ. सनेर हे चेअरमन म्हणून उपस्थित होते तसेच नागपूर येथील डॉ.संजय अहिरे, ज्योती चौधरी, लता मोरे यांनी देखील इतर सेशनला चेअरमन म्हणून त्यांनी जबाबदारी पाहिली .
दुपारच्या सत्रात लाईफ स्किल, आपत्ती व्यवस्थापन, पालकत्वाचे शिक्षण, पर्यावरण शिक्षण, शालेय व्यवस्थापन या विषयांच्या अभ्यासानुसार असे विश्लेषण गटनिहाय सादर करण्यात आले .या कार्यशाळेसाठी प्रा.डॉ.लता मोरे,डॉ.साहेबराव भुकन,डॉ.वाय.एच.सनेर.डॉ.एस.एन.भारंबे.यांचे अनमोल मार्ग दर्शन मिळाले.कार्यशाळेसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बीएड कॉलेजेस व शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील प्राचार्य व प्राध्यापक उपस्थित होते .एकूण ९० प्राध्यापकांनी यात सहभाग घेतला . या कार्यशाळेच्या आयोजनात प्रा..डॉ.शैलेजा भंगाळे,प्रा.डॉ.रंजना सोनवणे ,डॉ.गणेश पाटील,प्रा.सुभाष पावरा,इतर प्राध्यापकांनी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.