<
जळगाव-छत्रपती शिवाजी महाराजांनी कारकिर्दीत चौफेर क्षेत्रात एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे. छत्रपतींच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासह त्यांचे विचार प्रत्येकाच्या आचरणात असावेत, असे प्रतिपादन मुख्य अभियंता श्री. दीपक कुमठेकर यांनी केले.
बहूजन विद्युत अभियंता अधिकारी कर्मचारी फोरम च्या वतीने महावितरणच्या जळगाव परिमंडळ कार्यालय इमारतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्याचे तैलचित्राचे अनावरण श्री. कुमठेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास जळगाव मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री. फारुख शेख, अधिक्षक अभियंता (पायाभूत आराखडा) श्री. चंद्रशेखर मानकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
फोरमचे केंद्रीय कार्यकारिणी सचिव श्री.बी. डी. जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत प्रशासनाचे आभार मानले.
कार्यक्रमास वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) अमोल बोरसे, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर, वरिष्ठ व्यवस्थापक (मासं) रामचंद्र वैदकर, कार्यकारी अभियंता संजय तडवी, नितीन पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता धीरज बारापत्रे, विजय रावणकर, व्यवस्थापक (मासं) उध्दव कडवे, कनिष्ठ विधि अधिकारी जिवन बोडके, जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे तसेच संघटनेचे पदाधिकारी नितीन रामकुवर, चेतन नागरे, राहुल वडनेरे, चरण पांढरे, अनिल राठोड, महेश अडकमोल, प्रशांत शिरसाळे, गणेश जाधव, प्रशिक भास्कर, भालचंद्र काकुस्ते, इशत्याक पटेल, गोदावरी भांगरे, माधवी कुलकर्णी, ज्योती महाजन आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार परिमंडळ सचिव श्री. विजय सोनवणे यांनी केले.