<
जामनेर(प्रतिनीधी)- तालुक्यातील वाकोद समूह साधन केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषद शाळा वडाळी दिगर व पिंपळगाव खुर्द अत्यंत उत्साहात संपन्न झाल्या. बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामनेर तालुका शालेय पोषण आहार अधिक्षक विष्णू काळे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे, पिंपळगाव खुर्द चे पोलीस पाटील भागवत पाटील, शिक्षण प्रेमी शेषराव शिवदे व वाकोद केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांनी प्रास्ताविक व मार्गदर्शन करतांना सांगितले की, ग्रामीण भागात क्रीडा संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष चषक सारख्या क्रीडा स्पर्धांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या स्पर्धा अगोदर वाकोद केंद्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राबविल्या गेल्या त्यात प्रथम असलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रस्थरावर स्पर्धेसाठी बोलावण्यात आले होते व यातील विजेत्यांना तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागाची संधी मिळणार आहे. शापोआ अधीक्षक विष्णू काळे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की, वाकोद केंद्रातील शिक्षकांनी केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांच्या मार्गदर्शनात अतिशय उत्तम असे क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले असून निश्चितच अशा स्पर्धांमधून भविष्यात चांगले खेळाडू घडू शकतात. केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये विजेते पुढील प्रमाणे- इयत्ता १ली,२री गट लिंबू चमचा मोहित महाजन(पिंपळगाव खु), शेख जोया शेख बशीर(पिंपळगाव बु), ३० मी धावणे प्रेम शेळके(जांभोळ), नेतल चव्हाण(पिंपळगाव तांडा), इ.३री,४थी गट १००मी धावणे अनुज तडवी(वडगाव बु), दिपाली राठोड(पिंपळगाव तांडा), लंगडी मुले जांभोळ, मुली जांभोळ व वडाळी दिगर संयुक्तिक, कबड्डी मुले वडाळी दिगर, मुली पिंपळगाव तांडा,इ.५वी ते ८वी गट २००मी धावणे उमेश राठोड(पिंपळगाव तांडा), प्रिया पांढरे(पिंपळगाव बु), लंगडी मुले जांभोळ, मुली पिंपळगाव बु,कबड्डी मुले जांभोळ, मुली पिंपळगाव बु, खो-खो मुले जांभोळ, मुली पिंपळगाव बु. बक्षिस वितरण प्रसंगी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. सुत्रसंचलन वडाळी दिगर शाळेचे उपशिक्षक संदिप मधुसूदन पाटील यांनी केले तर आभार संतोष अहिरे यांनी मानले. स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी वाकोद केंद्रातील सर्व शिक्षकांनी, पिंपळगाव खुर्द व बुद्रुक, वडाळी दिगर येथील शा. व्य. समिती, नागरिक, पालक यांनी परिश्रम घेतले.