<
जळगाव-(जिमाका) – राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व भगवान महाविर विकलांग सहाय्यता समिती, जयपूर तथा एम.एल.ए. हॉस्टेल नागपूर यांच्या संयूक्त विद्यमाने 1 ते 7 मार्च 2020 रोजी एम.एल.ए. हॉस्टेल नागपून येथे दिव्यांग उपकरणे वाटपासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी दिव्यांग नि:शुल्क उपकरणे वाटप शिबिराचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त दिव्यांगांनी लाभ घ्यावा. असे आवाहन सचिव जिल्हा सेवा प्राधिकरण, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्ये केले आहे.