<
अवधूत गुप्ते यांची वेगळी अशी ओळख मराठी माणसाला करून द्यायची आवश्यकता नाही. जय जय महाराष्ट्र माझा आणि बाई बाई मनमोराचा या दोन गाण्यांच्या नादमधुर रिमिक्समुळे अवधूत गुप्ते हे नाव घराघरांत पोचलं. . त्याने मराठी व हिंदी गाण्यांसाठी पार्श्वगायन केले असून स्वतंत्रपणे संगीत-अल्बमांसाठी संगीत दिले आहे. त्याने मराठी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. तसेच दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाचे व परीक्षणाचे कामही त्याने केले आहे.सागरिका म्युझिक कंपनीच्या पाऊस या अल्बमामार्फत गायक-अधिक-संगीतकार म्हणून त्याचे पदार्पण झाले. त्यानंतर वैशाली सामंत हिच्यासोबत त्याने बनवलेला ऐका दाजीबा हा इंडिपॉप अल्बम कमालीचा लोकप्रिय झाला. त्यानंतर सारेगपम या कार्यक्रमाचा परीक्षक म्हणूनही गाजला. त्यांची दाद द्यायची पद्धत, कौतुक करायची पद्धत काही वेगळीच होती. अंगावर काटा आला, मित्रा तोडलंस! जिंकलंस!, टांगा पलटी घोडे फरार या शब्दांत दिलेली दाद स्पर्धकांचाही हुरूप वाढवत असे. कोणता झेंडा घेऊ हाती? असा थेट प्रश्न विचारत तो दिग्दर्शकाच्याही खुर्चीवर विराजमान झाला.
खुपते तिथे गुप्तेमुळे अवधूत गुप्तें मुलाखतकार ही झाले. मराठीतील आघाडीचे संगीतकार-गायक-निर्माते-दिग्दर्शक असा नावलौकिक असलेल्या अवधूत गुप्ते यांनी मराठी व हिंदी गाण्यांसाठी पार्श्वगायन केले असून स्वतंत्रपणे संगीत-अल्बमांसाठी संगीत दिले आहे. त्यांनी मराठी चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. तसेच दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालनाचे व परीक्षणाचे कामही केले आहे. ‘बाई बाई मनमोराचा पिसारा…..’, ‘जय जय महाराष्ट्र माझा…’, ‘पोरी जरा ‘;हळू हळू चाल…’ आणि ‘ढिपाडी ढिपांग’ या गाण्यांना तर रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. “झेंडा”, “मोरय्या”, “जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा” आणि “एक तारा” या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे.
– योगेश शुक्ल (9657701792)