<
जळगाव – (प्रतिनिधी) – केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्या.रेखा पाटील यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.विद्यार्थ्यांनी छ.शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारत सुंदर अशी भाषणे केली.तर काहींनी गीत गायन केले.
जयंती निमित्ताने शिवरायांच्या गड किल्ल्यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी या उद्दिष्टाने गड किल्ल्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले.रायगड , प्रतापगड ,शिवनेरी , सिंहगड ,कोंढाणा , जंजिरा या सारखी भव्य किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी तयार केल्या व प्रत्येक गडाची ओळख करून देत त्यांच्या संरक्षणासाठी आपण कसे प्रयत्न करावे हे पटवून दिले.
कार्यक्रमाचे आयोजन उपशिक्षक नेमीचंद झोपे , स्वाती पाटील यांनी केले तर यशस्वीतेसाठी योगेश भालेराव ,सुधीर वाणी आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.