<
जळगाव-(प्रतिनिधी) —गोदावरी अभियांत्रिकीत शिवजयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भव्य मिरवणूक काढण्यात येउन लेझीम पथकात मोठया संख्येने मुलींनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खा.डॉ.उल्हास पाटील प्रमुख वक्ते शिवव्याख्यानकर्ते प्रा अर्जुन पाटील, प्राचार्य डॉ. व्ही एच पाटील, उपप्राचार्य प्रा. प्रविण फालक, कार्यक्रमाचे संयोजक प्रा.देवेंद्र मराठे इ मान्यवरांच्या उपस्थीतीत शिवपूजन करण्यात आले.सकाळी ९ महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारापासून मुलींच्या भव्य लेझीम पथकासह राजेंच्या भव्य मिरवणूकीस प्रारंभ झाला. यावेळी मार्गदर्शन करतांना माजी खा.तथा गोदावरीचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांनी शिवाजी महाराजांची युध्दनिती कला अवगत करून आयुष्यातील मोठया संकटावर न खचता सामोरे जात मात करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहीजे.शिव व्याख्यानकर्ते प्रा अर्जुन पाटील यांनी शिवाजी महाराजांचा गौरवशाही इतिहासावर प्रकाश टाकतांना शिवाजी महाराजांनी श्रमता व सर्वधर्म स्वराज्य स्थापन केले त्यांनी कधी कुठल्या जातीधर्माचा अनादर केला नाही. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ललीत इंगळे यांनी तर आभार वैभव तराले यांनी मानले यशस्वीतेसाठी प्रा देवेंद्र मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल नकुल गाडगे, वैभव तराले, शुभम तिफणे,चेतन बढे, रोहीत मोरे आदिंनी परिश्रम घेतले
आज उल्हास २०२० स्नेहसंमेलनाचे आयोजन
माजी खा. डॉ उल्हास पाटील यांचा दि २३ फेबु्रवारी रोजी वाढदिवस असल्याने गोदावरी अभियांत्रिकीत आज उल्हास २०२० स्नेहसंमेलन आयोजीत करण्यात आले आहे.
यात सकाळी ९ वा रक्तदान शिबिर तर दु. १२ वा शेलापागोटे, संध्याकाळी ५.०० वा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यार्थी गायन,वादन,नृत्य कला सादर करणार आहे यावेळी माजी खा. डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्य डॉ.केतकी पाटील, गोदावरी पाटील, आदि मान्यवर उपस्थीत राहणार आहे.