<
जळगाव-(प्रतिनिधी) – येथील गोदावरी अभियांत्रिकीत राष्ट्रीय स्तरावरील टेक्नीकल स्पर्धा फिनिक्स २०२० चा समारोप करण्यात आला. १५ प्रकारच्या स्पर्धेतून विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
गेल्या १८ वर्षापासून सतत गोदावरी अभियात्रिकीत या स्पर्धेचे आयोजन करत आले आहे. दरवर्षी सहभागी स्पर्धक हौसेने सहभागी होत असतात. सहभागी स्पर्धकांची संख्या सतत वाढत जावून यावेळी ८०० स्पर्धक सहभागी झाले. सकाळी ९ वा या कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी पॅकवेल इंडीया प्रा. लि चे संचालक प्रविण पटेल,छबी इलेक्ट्रीकलचे संचालक छबीलराज राणे, गोदावरी फॉउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, गोदावरी अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ विजय एच पाटील, उपप्राचार्य प्रा प्रविण फालक, इ मान्यवर उपस्थीत होते. या स्पर्धेत लेथ वॉर प्रथम गोदावरीचा मयुर चौधरी व व्दीतीय जोगेंद्र घोडाके, जूगाडू कलाकार प्रताप कॉलेजचा विक्रांत इंगळे प्रथम तर शासकीय महाविद्यालयाचा नोहील कंचोले, स्पेल बी प्रथम नुतन मराठाचा धुलाबा पावरा,व्दीतीय गोदावरीचा विजय नार्गाव, हायड्रो लॉन्च प्रथम गोदावरी अभिनित भावसार तर व्दीतीय गोदावरी हुषीकेश नेहेते , प्रोजेक्ट प्रदर्शन प्रथम केसीइचा चेतन गिरनारे तर व्दीतीय गोदावरीचे देवयानी फालक अँन्ड गु्रप, गुगल विझार्ड गोदावरी चिन्मय शिंदवाडे तर व्दीतीय एसएसजीबी भुसावळ अक्षय पाटील, पोस्टर प्रदर्शन प्रथम गोदावरी शे.अहमद रजा अँन्ड गु्रप तर व्दितीय हीमांशु मराठे नाहटा भुसावह, इ क्वीज मी प्रथम जी एच रायसोनी हार्दिक कुमार तर व्दीतीय रायसोनी सौरभ तोमर, सी वॉर एसएसजीबी भुसावळ जयेश महाजन प्रथम तर व्दीतीय केसीई चेतन गिरनारे, पबजी प्रथम गोदावरी आयएमआरचे बडीज तर व्दितीय गोदावरी इंजी व्हीयब्रेनियम,अॅड मॅड शो नाहटा भुसावळची प्रियंका पाटील प्रथम तर व्दीतीय डीएनसी जळगाव संकेत वारूळकर, सर्कीट मानीया गोदावरीचा निखील मंडाळे प्रथम केसीईचा कौशल धांडे व्दीतीय विजेते ठरले.गोदावरीचे प्राचार्य डॉ व्ही एच पाटील, उपप्राचार्य प्रा प्रविण फालक,प्रा राहूल गायकवाड व सर्व विभागप्रमुखांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.विजेत्यांना रोख बक्षीस, मानचिन्ह, व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन ललीत इंगळे, विमला पोखरेल, यशस्वीतेसाठी गोदावरी अभियांत्रिकीच्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचा—यांनी परिश्रम घेतले.