<
जळगाव-(प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मेहरुण येथील श्री. संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
शाळेतील चौथी ते सातवीच्या वर्गासाठी चित्रकला स्पर्धा झाली. त्यात मोठा गटामध्ये दुर्गेश विश्वनाथ इंगळे प्रथम, काजल सुर्वे द्वितीय क्रमांक पटकावला. तर छोट्या गटामध्ये निलेश इंगळे प्रथम, गौरी चौधरी द्वितीयस्थानी होती. तसेच सिनीअर के.जी. ते तिसरी वर्गासाठी झालेल्या रंगभरण स्पर्धेत नैतिक किर्दक प्रथम, पुर्वेश गजानन पाटील द्वितीय तर सार्थक शितोळे याने तृतिय क्रमांक पटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका शितल कोळी होत्या.
चिमुकल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांवरील जीवनावरील चित्रपट दाखविण्यात आला. यावेळी तिसरी ते सातवीच्या मुलांनी महाराजांवर मनोगत व्यक्त केले. तर भूमिका पाटील, तरन्नूम मुस्ताक तडवी, भाग्यश्री मिस्त्री यांनी विविध गितांचे सादरीकरण केले. उत्कृर्षा सपके (इ.७ वी) हिने महाराजांच्या जीवनावर पोवाडा सादर केला. तर पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध गितांवर नृत्य सादर करुन उपस्थितांचे मने जिंकली.
कार्यक्रमाचे नियोजन मुकेश नाईक यांनी केले. सूत्रसंचालन साधना शिरसाठ यांनी तर आभार जष्मा पाटील यांनी मानले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.