<
भडगांव-(प्रतिनीधी) – तालुक्यातील, वाक येथिल शासकिय बाल वस्ती गृह येथे अखिल भारतीय मराठा महासंघ तर्फे विद्यार्थ्यानां शालेय साहीत्य वाटप करण्यात आले.
अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
या वेळी कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणुन भडगांव नगरपालिकेचे नगरसेविका सौ योजनाताई पाटील व श्री डी. डी. पाटीलसर ( मुख्यध्यापक) वाकचे सरपंच श्री कैलास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते स्वप्नील पाटील, पत्रकार भानुदास महाजन, निलेश पाटीलसर, वडजी येथिल नाना पाटील, देविदास अमृतकर, वस्तीगृह अधिक्षक श्री आर. पी. पाटील, श्री जी. के. जाधव, श्री जी. बी. पाटील, श्री ऐ. बी. अहिरराव,श्री व्ही. ऐस. पाटील, श्री ऐस.पी. काळे, श्रीमती पिजारी मँडम, श्री आर.ऐम. गायकवाड, भावेश पिजारी, ईत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा प्रमुख डाँ बी. बी. भोसले यांनी केले होते.