<
रायसोनी इस्टीट्यूटतर्फे आयोजन ; महोत्सवाला असणार विनामुल्य प्रवेश
जळगाव, ता. २० : ‘कोकण कन्या’ म्हटले की, तरुणपिढी आणि संगीत असे समीकरणच जुळले आहे. नव्यानेच उदयास आलेल्या प्रतिष्टीत “रायझिंग स्टार” स्पर्धेतील विजेते “कोकण कन्या” या संस्थेने मागील काळात अनेक वेगवेगळ्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन आणि सामाजिक बांधिलकी जपण्याकरता काही सामाजिक उपक्रम राबवले आहे. भविष्यामध्येही असे कार्य करण्याचे त्यांचे ध्येय आहे. कोकणातील शास्त्रीय संगीत हे टिकून राहावे आणि त्याचे आचरण नवीन पिढीकडून व्हावे, यासाठी संस्था कार्यरत आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी रायसोनी इस्टीट्यूटने ‘कोकण कन्या’ या गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आज शुक्रवार, ता. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव शहरातील संभाजी राजे नाट्यगृह येथे हा कार्यक्रम रंगणार असून यामध्ये रागसंगीत आणि त्यावर आधारित गाणी असे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात कलर्स टीव्हीवरील “रायझिंग स्टार” या स्पर्धेतील विविध विजेते सहभागी होणार आहेत. तसेच हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य खुला असून शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू, रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद खराटे यांनी केले आहे.