<
नाशिक : इंडियन रेडक्रॉस सोसायटी, नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने उद्या ( रविवार , २३ फेब्रुवारी रोजी ) अस्थिरोग निदान , अस्थिघनता (हाडांचा ठिसूळ पणा) तपासणी व फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी अस्थिरोगतज्ञ डॉ. प्रशांत भुतडा आणि फिजिओथेरपीस्ट डॉ. सूरज मनमाने यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. यावेळी शिबिरार्थींची हाडांचा ठिसूळपणा ही तपासणी वेगळे शुल्क न आकारता करण्यात येईल . तसेच फिजिओथेरपी (भौतिक उपचारा) संबंधी तज्ज्ञांचे विनामूल्य मार्गदर्शन मिळणार आहे.
रविवार दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १२.३० या वेळेत रेड क्रॉस हॉल होणाऱ्या या शिबिरासाठी नाममात्र नोंदणी शुल्क रु.२० आकारण्यात येईल.
तरी शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मेजर पी एम् भगत , सचिव, रेडक्रॉस तसेच शिबिर संयोजक डॉ. प्रतिभा औंधकर, डॉ. क्षितिज कौशिक व रेडक्रॉस कार्यकारिणीने केले आहे. अधिक माहितीसाठी रेडक्रॉसच्या ०२५३-२५०४९२६ या क्रमांकावर संपर्क साधावा.