<
जळगाव-(प्रतिनिधी) – जळगांव जिल्हा अर्बन को -ऑप बँक्स असोसिएशन लि. जळगांवच्या उपाध्यक्षपदी दि अर्बन को -ऑप बँक लि. धरणगावचे संचालक मा. श्री. प्रविणभाऊ कुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. असोसिएशनच्या मा. संचालक मंडळाची सभा अध्यासी अधिकारी श्री. आय. बी. तडवी यांचे अध्यक्षतेखाली झाली.
सभेस असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. सतिशभाऊ मदाने, संचालक मा. श्री. चंद्रहासभाई गुजराथी, मा. श्री. दादासाहेब नेवे, मा. श्री. ज्ञानेश्वरभाऊ महाजन, मा. श्री. शरदभाऊ यावलकर, मा. श्री. विवेकभाऊ पाटील, मा. श्री. अशोकबापू खलाने, मा. सौ. शांताताई वाणी, मा. डॉ. नरेंद्रदादा शिरसाठ, मा. श्री. लालचंदजी सैनानी, मा. श्री. सुरेश झोपे, मा. संजयभाऊ बिर्ला आदी मान्यवर उपस्थित होते.