<
जळगांव(प्रतिनिधी)- येथील मौलाना आझाद फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा आदर्श पुरस्कार येथील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाचे उपशिक्षक किशोर हरी घुले यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. त्यांना 23 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका जे.आर. गोसावी, उपमुख्याध्यापक ए. व्ही. ठोसर, पर्यवेक्षक एस.जी. काळे, उपचिटणीस एस. डी. खडके, पी.पी. अत्तरदे, पी.ए. पाटील आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.