<
ऑटो इंडिया रेसिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पटकावले तृतीय परितोषिक
जळगाव : येथील जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी ११० किलोग्रॅम वजनाची अनोखी रेसिंग कार तयार केली आहे. ही कार एका तासात जास्तीत जास्त ८० किमी. अंतर पार करण्याची क्षमता ठेवते, अशी माहिती या विद्यार्थ्यांनी दिली.
पुणे येथील शासकीय आर. टी. ओ ट्रॅक येथे झालेल्या राष्ट्रीय रेसिंग स्पर्धेत रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत या रेसिंग कारची निर्मिती केली आहे. या स्पर्धेत देशभरातून एकूण ४५ संघांमध्ये त्यांना ‘गोकार्ट’ कडून ठरलेल्या सर्व चाचण्या पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. एक समान रस्त्यावर चालणारी ही कार आहे. अचानक ब्रेक लावून थांबविणे, पुढच्या सेकंदाला पुन्हा वेगाने स्पर्धा करणे असे वेगळे अनुभव देणारी ही कार आहे. ऑटो इंडिया रेसिंग चॅम्पियनशीप यांच्यातर्फे आयोजित पुणे येथे चित्तथरारक रेसिंग स्पर्धा पार पडली. या वेळी ५ किमी. अंतराचा थरारक ट्रॅक तयार करण्यात आला होता येथील स्पर्धेत विध्यार्थ्यानी तृतीय परितोषिक पटकावले. यशस्वी विद्यार्ध्यांच्या यशाबद्दल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी, प्राचार्य डॉ. ए. जी. मैथ्यु, मॅकेनिकल विभागप्रमुख डॉ.संजय निखाडे, सुदर्शन ऑटोमोबाईल्स बजाजचे आबा महाजन व महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच इतर कर्मचार्यांनी कौतुक केले.
कारची वैशिष्ट्ये
विद्यार्थ्यांनी रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील वर्कशॉपमध्ये ही कार तयार केली आहे. कार बनविण्यासाठी दुचाकीचे १२५ सीसी इंजिन व ब्रेक पद्धती वापरली आहे. स्पर्धांमध्ये विना अपघात निर्धारित वेळेत होणाऱ्या ब्रेक टेस्टिंग, ड्रग रेसिंग, नाईट रेसिंग, ऑटो क्रॉस रेसिंग व स्किड पेड रेसिंग या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करून सहभाग नोंदविला.
‘टीम गोकार्ट’ यांचा सहभाग
कर्णधार- भुषण महाजन, उप कर्णधार – प्रज्वल पाटील, ड्रायवर जयेश नेहेते, दुर्गेश चौधरी, प्रथमेश बावीस्कर, तुषार पाटील, राकेश खडके, महेश बर्डे, रुचा चौधरी, नम्रता महांगडे, गौरव जोशी, रोहित ठाकरे, शुभम पाटील, ललित पाटील, मयूर पाटील, देवेंद्र चोपडे, शुभम गवळी, जयेश महाजन, निखिल सोनवणे, श्रीकांत चव्हाण या विद्यार्थ्यांनी ही गोकार्ट रेसिंग कार तयार केली आहे. त्यांना मार्गदर्शक प्रा. दत्तात्रय चोपडे हे होते.