<
रायसोनी इस्टीट्यूटतर्फे आयोजन ; हिंदी गीतांपासून मराठी गीतापर्यंतचा सुरेल प्रवास झाला संभाजीराजे नाट्यगृहात सादर
जळगाव, ता. २२ : नवराई माझी लाडाची लाडाची गं…आवड हिला चंद्राची चंद्राची गं..व्ही. आर. कोकण कन्या…छोटीशी आशा…देखा एक ख्वाब तो. सील-सिले बने…बदमाश दिल तू ठग हे बडा…असे हिंदी, मराठी चित्रपटातील एकसे बढकर एक सदाबहार गीते सदर करून कोकण कन्यांच्या दिलखेचक अदानी रसिक मंत्रमुग्ध झाले होते. निमित्त होते रायसोनी इस्टीट्यूटच्या वतीने आयोजित कोकण महोत्सवाचे.
छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात गुरुवार ता. २१ रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले. त्यात त्यांनी महाविध्यालयाची शैक्षणिक व उपक्रमाची माहिती दिली. त्यानंतर कोकण कन्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नव्या गीतांची चित्रपटसृष्टीत सातत्याने भर पडत असली तरी ‘जुनं ते सोनं’ म्हणत जुन्या गीतांची आठवण सातत्याने काढली जाते. वारंवार गुणगुणल्या जाणाऱ्या व गाजलेल्या गीतांचा आस्वाद पुन्हा एकदा रसिकांना घेता यावा म्हणून कोकण कन्यांनी मोठ्या उत्साहाणे आपली कला जळगावकरासमोर सादर केली . यावेळी श्री. अविनाश रायसोनी, शेखर रायसोनी, भारती रायसोनी, प्रभा रायसोनी, जोत्स्ना रायसोनी, राजुल रायसोनी, मेहेन्द्र रायसोनी, डॉ. नीरज अग्रवाल, डॉ. एकता अग्रवाल, रायसोनी अभियांत्रिकी महाविध्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू, रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रल्हाद खराटे उपस्थित होते. प्रा. विजय गर्गे यांनी अभ्यासपूर्ण निवेदनाने कार्यक्रमाची धुरा पेलली तर रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितम रायसोनी यांची ही संकल्पना होती.