<
जळगाव – (धर्मेश पालवे) दि. २७ जुलै हा जागतिक हेड & नेक कॅन्सर डे म्हणून सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्र राज्यातील शाळेतील विद्यार्थ्याना जबाबदार नागरिक व संस्कारक्षम युवा पिढी घडवण्यासाठी त्याच बरोबर शिक्षण संस्था व परिसर तंबाखू मुक्त करण्यासाठी राज्यात चला घडवूया व्यसनमुक्त समाज अभियानाची मागील तीन वर्षांपासून सुरुवात झाली.
राज्यातील शिक्षण संस्था व रोटरी डिस्ट्रिकट ३०३० आणि सबंध हेल्थ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक, जळगांव, बुलढाणा,यवतमाळ,वर्धा,अकोला,चंद्रपूर,व नागपूर या विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना तंबाखूचा धोका आणि त्याचे दुष्परिणाम या बाबत चला घडवूया व्यसनमुक्त समाज या मोहिमे अंतर्गत कर्म जागृती तंबाखू मुक्ती जनजागृती अभियानाचे आयोजन २७ जुलै २०१८ रोजी राबविण्यात आले होते. त्यापैकी वरील जिल्ह्यातील २६४५७९१ ( सव्वीसलाख पंचेचाळीस हजार सातशे एक्कनोव्ह ) शालेय विद्यार्थ्यांना व शिक्षकांना तंबाखू विरोधी भावनिक लघुपट दाखवून भविष्यात तंबाखू चे व्यसन न करण्याची शपथ घेतली. यामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षनाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
-:कसे राबवले गेले अभियान:-
अभियाना साठी आवश्यक असणारा लघुपट www.drmantri.in या संकेत स्थळावर मोफत उपलब्ध होता.सर्व शाळांनी या संकेत स्थळावरून लघुपट डाऊनलोड केला.शाळेत लघुपट दाखविल्या नंतर कार्यक्रमाचे फोटो, हजर विद्यार्थी संख्या, व कार्यक्रम संदर्भातील मुख्यध्यापकाचे स्वयं घोषणा पत्र त्याच दिवशी वरील संकेत स्थळावर अपलोड केले गेले.
एक महिन्यानंतर शिक्षण विभागाने २८ ऑगस्ट २०१८ रोजी पत्रक काढून आयोजकांना कळवले की या अभियानात २६४५७९१ शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.हे अभियान या वर्षीच्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवले जाणार आहे.
या आधी असाच विक्रम डाँ. गोविंद मंत्री यांच्याच अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद जळगाव व रोटरी जळगाव ईस्ट यांच्या नावे इंडिया बुक आँफ रेकाँर्ड व आशिया बुक आँफ रेकाँर्डसमध्ये २०१६ साली नोंदविले गेले होते ज्यात जळगाव जिल्ह्यातील १८३७३० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
आता हा अभियान रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० च्या माध्यमाने डाँ. गोविंद मंत्री यांनी ९ जिल्ह्यांमधे यशस्वीरित्या राबविला. पुढील वर्षी संपूर्ण राज्यात हे अभियान किमान एक कोटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा मानस डाँ. गोविंद मंत्री यांनी केला आहे व त्याचे नियोजनही सुरू झाले आहे.
या सदरील अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट चेअरमन डाँ. गोविंद मंत्री यांना टाटा कँसर हाँस्पीटल मुंबईचे डाँ पंकज चतर्वेदी, संबंध हेल्थ फाऊंडेशन मुंबई व रोटरीचे माजी प्रांतपाल राजीव शर्मा यांचे मार्गदर्शन तसेच माजी डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी लक्ष्मीकांत मणियार व प्रेसिडेंट एनक्लेव विष्णुभाऊ भंगाळे व सर्व रोटरी क्लब अध्यक्षांचे यांचे सहकार्य लाभले.