<
खडके बु ता एरंडोल-(प्रतिनीधी) – येथे हिंदू धर्म जागृती पर मार्गदर्शन दि,२१/०२/२०२० रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आले, त्यात वक्ते म्हणून श्री निखिल कदम,जळगाव, जितेंद्र चौधरी पाळधी, योगेश माळी, खर्ची, हे होते वक्ते श्री कदम यांनी सांगितले की हिंदू बांधवांनो, श्रीरामाचे आदर्श “रामराज्य”अन छत्रपती शिवरायांचे “हिंदवी स्वराज्य”जेथे साकारले तो भारत ‘सेक्युलर नसुन हिंदू राष्ट्र च आहे, या हिंदू राष्ट्र संकल्पनेला वैधानिक आधार मिळवण्यासाठी आपण संघटित झाले पाहिजे असे वक्तव्य देखील त्यांनी यावेळी केले, तसेच ते पुढे म्हणाले की सेक्युलर सरकार हिंदू ची मंदिरे ताब्यात घेतात मंदिरातील धन अन्य धार्मियांसाठी खर्च करतात, कुंभमेळा सारख्या यात्रांवर कर लावतात हे किती सहन करावे. समान नागरी कायदा केला जात नाही, तसेच गोहत्या करणे बंद केले पाहिजेत. हिंदू मध्ये जातीच्या आधारे फूट पाडणे चालूच आहे, कलियुगात संघटित रहाण्यानेच बळ प्राप्त होते, तसेच हिंदूंवर कोणतेही अन्याय होणार नाही देशात सर्वाना समान न्याय मिळेल आपल्या माता भगिनीकडे वक्रदृष्टी पाहण्याचे कोणालाही धाडस होणार नाही, हिंदूंना स्वदेशात जीवाच्या भीतीने स्थलनंतरीत जीवन जगावे लागणार नाही, “मी एकटा काय करू “असे म्हणून गप्प बसू नका जनलोकपाल सारखे कायदे तीव्र लोकमागणी नंतरच अस्तित्वात आहे,हे लक्षात घ्या संघटित व्हा भारत हे आदर्श हिंदू राष्ट्र आहे हिंदूंचे संघटन ही काळाची आवश्यकता आहे, म्हणून भारत हे आदर्श। हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी शासनाला भाग पाडा असे वक्तव्य देखील त्यांनी सांगितले. यावेळी मार्गदर्शन देशदूत चे पत्रकार वाल्मिक पाटील, पुण्यनगरी चे पत्रकार अतुल पाटील, सह सागर पाटील, दीपक साळुंखे, संदीप निळे,संदीप धनगर, योगेश्वर पाटील, भूषण महाले,विकास पा,सचिन धुमाळ,दत्तू पा, किरण साळुंखे, सोपान पा,जगदीश, पा, कपिल पा, प्रदीप धनगर, जयेश धनगर, मनोहर पा, गणेश पा, दत्ता शिंदे, गोकुळ साळुंखे उमेश बाविस्कर सह तरुण युवक यावेळी मार्गदर्शन पर उपस्थित होते.