<
जळगांव-(प्रतिनिधी)- एस. एस. मणियार विधी महाविद्यालय आयोजित डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे स्मृती १५ व्या अभिरूप न्यायालय स्पर्धेचे बक्षिस वितरण प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमुर्ती मा. ए.पी. भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये सिम्बायोसीस लाँ स्कुल, पुणे संघाने विजेतेपद पटकावले. विजेत्या संघास डाँ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे फिरते चषक, प्रमाणपत्र व रोख रकमेचे पारितोषीक देण्यात आले. द्वितीय क्रमांकाचे फिरते चषक, प्रमाणपत्र व रोख रकमेचे पारितोषीक पुणे येथील नवलमल फिरोदीया लाँ संघाने प्राप्त केले. सिम्बायोशीस लाँ स्कुल पुणेच्या कु. संगिता टि.एस. हिला उत्कृष्ट विद्यार्थीनी वकील साठीचे चषक, प्रमाणपत्र व रोख रकमेचे पारितोषीक देण्यात आले.
तसेच डाँ. पंजाबराव देशमुख काँलेज आँफ लाँ अमरावतीच्या हितेश गवलानी यास उत्कृष्ट विद्यार्थी वकील साठीचे चषक, प्रमाणपत्र व रोख पारितोषीक बहाल करण्यात आले. त्याच बरोबर चषक, प्रमाणपत्र व रोख रकमेचे उत्कृष्ट मेमोरियल पारितोषीक अमरावती येथील डाँ. पंजाबराव देशमुख काँलेज आँफ लाँ संघाना देण्यात आले. तद्नंतर महाविद्यालयाचे प्राध्यापक डाँ. डी.आर. क्षिरसागर डाँ.योगेश महाजन, डाँ. अंजली बोंदर यांचा पिएचडी प्राप्त झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी जळगावचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश मा. जी.ए. सानप यांची विशेष उपस्थिती लाभली. जळगांव जिल्हा बार असोशिएशनचे अध्यक्ष अँड. दिलीप बोरसे, केसीई सोसायटीचे सहसचिव अँड. प्रमोद पाटिल, महाराष्ट्र आणि गोवा बार कौऊन्सिलचे माजी सदस्य अँड. विपीन बेंडाळे केसीई सोसायटीचे सदस्य अँड. सुनिल डी. चौधरी यांची उपस्थिती लाभली. यावेळी मंचावर प्राचार्य डाँ. बी. युवाकुमार रेड्डी, समन्वयिका डाँ. विजेता सिंग हे होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केसीई सोसायटीचे उपाध्यक्ष अँड. प्रकाश बी. पाटील यांनी भुषविले. कार्यक्रमास पँनेल जजेस म्हणून स्पर्धेचे परिक्षण केलेले न्यायालयीन अधिकारी श्री. देशपांडे, श्वेता चांडक तसेच जेष्ठ वकिल अँड. सुरेंद्र काबरा, अँड. सागर चित्रे, अँड.एस. बी. अग्रवाल, सुरज जहांगीर, अँड. महिमा मिश्रा. अँड. वसंत ढाके, अँड. महेश भोकरीकर, अँड. रुपाली भोकरीकर, अँड. आनंद मजूमदार, अँड. रविंद्र पाटिल, अँड. सत्यजित पाटिल, अँड. अतुल सुर्यवंशी, अँड. सौरभ मुंदडा व महाविद्यालयाचे प्राध्यापक डाँ. डी.आर क्षिरसागर, डाँ. रेखा पाहुजा, प्रा. जि.व्ही. धुमाळे, डाँ. योगेश महाजन, डाँ. अंजली बोंदर, प्रा. अमिता वराडे आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना, न्या. भंगाळे सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले व विजेत्या संघाचे अभिनंदन केले. तसेच विद्यार्थांनी हार-जितचा विचार न करता अपयश आपल्या वाट्याला का आले याचा विचार करण्याचे आवाहन केले.
तसेच ग्राहक तक्रार निवारण मंचच्या न्याय प्रक्रीयेवर भाष्य करताना वर्तमान काळात तांत्रीक बाबींपेक्षा न्यायाची भूमीका अवलंबून प्रक्रिया राबिवली जात असल्याचे स्पष्ट केले व याबाबतीत महाराष्ट्र एक आघाडीवरचे राज्य असल्याचे अधोरेखीत केले. तत्पुर्वी श्री. सानप यांनी स्पर्धेकांच्या युक्तीवादाचे कौतुक केले व न्यायालयीन क्षेत्राचे भवितव्य प्रकाशमय असल्याचा विश्वास व्यक्त केला व महाविद्यालयाच्या वाटचालीचे कौतुक केले.
त्यानंतर अँड. प्रकाश बी. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व स्पर्धेक व विज्येत्या संघाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला प्राचार्य डाँ. युवाकुमार रेड्डी यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणात उपस्थित मान्यवर पाहुणे व सहभागी स्पर्धेकांचे स्वागत व अभिनंदन केले. न्या.भंगाळे, न्या. सानप यांचा संस्थेच्या वतीने अँड. प्रकाश पाटिल यांनी सत्कार केला. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. विजेत्यांच्या नावाची घोषणा डाँ. डी.आर. क्षिरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थी निरंजन ढाके व कु. मिताली वाणी यांनी केले.
शेवटी मूट कोर्ट सोसायटीच्या सन्मवयिका डाँ. विजेता सिंग यांनी आभार मानले व राष्ट्रगिताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी निरंजन ढाके, भक्ती काबरा, शिरीन शेख, समीर देशपांडे, निलेश जाधव आदी विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी सुनिल झांबरे, भुषण चौधरी, हर्षल चिरमाडे, के.एम. अहिरे, मुबारक तडवी आदींनी सहकार्य केले.