<
२६ जुलै कारगिल दिन सलाम त्या मातेच्या पुत्राला सलाम त्या भारतमातेच्या वीरपुत्राला जो छातीवर गोळ्या झेलून सुद्धा मरणाच्या दारात उभा राहतो आजचा दिवस या सर्व महान सुपुत्रांना आठवण करण्याचा व त्यांच्या स्मृतीस वंदन करण्याचा आहे.
१९९९ च्या उन्हाळ्यात कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान लढले गेले.युध्याची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिस्थितीपूरती मर्यादित राहिली.त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात.इ स १९९९ च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरु झाले. हि ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्नानंतर भारताला हि ठाणी परत मिळविण्यात यश मिळाले हे युद्ध आधुनिक इतिहासतील अतिउंचीवरच्या युध्याचे उत्कृष्ट उदाहरणं आहे.दोन्ही देश अन्ववस्त्रसज्ज झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष हे युद्ध कसे कसे पुढे चालले आहे याकडे होते.परंतु भारताने हे युद्ध कारगिल पुरतेच मर्यादित ठेवले त्यामुळे दाखवलेल्या सयंमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. म्हणूनच भारतात आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व याउलट सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला.
कारगिल हे जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून २०५ किलोमीटर अंतरावर आहे. हे शहर पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल वसलेले आहे. कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता हे होय. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा १६० किलोमीटरच्या पट्यातच साधारणपणे घुसखोरी केली. कारगिल, द्रास व मश्को खोऱ्यातील चौक्या ह्या अतिउंचीवर आहेत. या चौक्या डोंगरमाथ्यावरील किल्ल्याप्रमाणे होत्या त्यांचा ताबा मिळविण्यास मोठ्या प्रमाणावर फौजेची गरज लागते त्यातच अतिउंची व कडाक्याची थंडी हे काम अजूनच अवघड करत होते. तरी भारतीय सैन्य न डगमगता देशासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करता झुंज देत राहिली.
भारतीय सरकारने "ऑपेरेशन विजय" या नावाखाली कारगिल युध्यासाठी कार्यवाही चालू केली. त्यासाठी संख्येने मुळात सुमारे २, ००, ००० इतक्या फौजेचा आधार घेण्यात आला. परंतु भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणावर युद्ध होणे शक्य नव्हते त्यामुळे रेजिमेंटल व बटालियन पुरतीच कार्यवाही शक्य होती. फौजेची संख्या २०,००० पर्यंतच मर्यादित ठेवण्यात आली. अर्धसैनिक व वायुदल मिळून भारताने एकूण ३०,००० पर्यंत सैनिक कारगिलच्या युद्धत वापरले. घुसखोरांची संख्या पाकिस्तानी सूत्रांनुसार साधारणपणे ५००० होती यात पाकव्याप्त काश्मीरमधील तोफखान्यातील सैनिकही समाविष्ट होते. भारतीय वायुसेनेकडून "ऑपेरेशन सफेद सागर" सुरु झाले. या ऑपेरेशनद्वारे पायदळ सैन्याची ने-आण करण्याची मोठी भूमिका वायुसेनेने निभावली.भारतीय नौदलानेही पाकिस्तानी बंदरांना आपले लक्ष केले व त्यामध्ये येणाऱ्या जहाजांची कोंडी केली. कराची बंदर हे खासकरून लक्ष करण्यात आले. या कृत्याने पाकिस्तानला आवश्यक अशा जीवनावश्यक वस्तूंची रसद थांबवली गेली. काही काळाने नवाज शरीफ यांनी उलगडून सांगितले की, पाकिस्तानकडे या काळात फक्त ६ दिवसांचाच इंधन साठा राहिला होता जर पूर्ण युद्ध सुरु झाले असते तर पाकिस्तानची बरीच नाचक्की झाली असती.
कारगिलचे युद्ध भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले. अनेक वाहिन्यांत युद्ध क्षेत्रात जाऊन बातम्यांचे संकलन करण्यात चढाओढ झाली. त्यामुळे भारतीय युध्यातील क्षणचित्रे टीव्हीवर पाहायला मिळाली. त्यामुळे भारतात एकंदर राष्ट्रीयत्व्याच्या विचारसरणीने चांगलेच मूळ धरले. या युध्यानंतर भरलेल्या कित्येक सैन्य भरती शिबिरांना अनेक राज्यात अफाट प्रतिसाद मिळाला.
"कुछ याद उन्हे भी करलो,
जो लोट के घर ना आये.. !
अशा या भारतमातेच्या वीरसुपुत्रांना आपल्या स्मुर्तीस ठेवण्याचा हा दिवस आपण कारगिल दिन म्हणून साजरा करत असतो. अशा अवघड परिस्थितीत आपले सैन्य न डगमगता प्राणाची पर्वा न करता आपल्या देशाप्रती आपले कर्तव्य समजून आपल्या प्राणाची आहुती देऊन युध्यात विजय मिळविला खऱ्या अर्थाने हा “विजय दिन” ठरला.
“जय हिंद, जय भारत.. !”
मनोज भालेराव(शिक्षक) प्रगती विद्यामंदिर,जळगाव मो.न.8421465561