<
जामनेर-(अभिमान झाल्टे) – भारतीय जनता पार्टीची जंबो तालुका कार्यकारीणी (२२)रोजी झालेल्या बैठकीमधे तालुकाध्यक्ष चंद्रकांत बावीस्कर यांनी जाहीर केली.
याआधी कार्यकारीणीतील विवीध पदांसह, आघाड्या, सदस्यांच्या नावांना माजीमंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांची मान्यता घेण्यात आल्याचे बैठकीमधे सांगण्यात आले.शनिवार दुपारी महालक्ष्मी पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या तालुका बैठकीमधे सुमारे शंभर जणांचा समावेश असलेली तालुक्याची कार्यकारीणीला एकमताने मंजुरी देण्यात आली. यात तालुकाध्यक्ष बावीस्कर आणी कायम निमंत्रीतांशिवाय आनंदा लाव्हरे,रवींद्र झाल्टे (सरचिटणीस), समाधान पाटील,अर्जुन वाघ, प्रयाग कोळी,कवीता देशमुख,संजय पाटील,सुनील शिनकर,बाळु चव्हाण,भगवान ईंगळे,सैय्यद मुश्ताक, रमेश नाईक,राजू अजमेरे(सर्व उपाध्यक्ष), अशोक पाटील,सवीता बोंडे,महेमुद तडवी,कवीता सोनार,ज्ञानेश्वर सोनवणे, राजु चव्हाण,लक्ष्मण गोरे,ज्ञानेश्वर चव्हाण,विलास खोडपे(सर्व चिटणीस), शैलेश गिल (कोषाध्यक्ष), संदीप ललवाणी (सहकोषाध्यक्ष),शांताराम जाधव (प्रसिध्दीप्रमुख),मयुर पाटील (कार्यालयीन प्रमुख) यांचेसह कार्यकारीणी सदस्यांचा समावेश आहे.
याशिवाय तालुका महीलामोर्चा-रंजना धुमाळ, अनु- जाती:मुकुंदा सुरवाडे, अनु-जमाती:बिलाल तडवी, दिव्यांगआघाडी:गणेश साळुंखे, सोशलमिडीया:राहुल पाटील, वैद्यकीयआघाडी:डॉ प्रशांत भोंडे, अल्पसंख्यांक:शेख अस्लम शेख शफी,व्यापारी:पुखराज डांगी, शेतकरीआघाडी:बापु काळबैले, ओबीसी:वासुदेव घोंगडे, वारकरी संप्रदाय आघाडी:गजानन महाराज यांचीही त्या-त्या आघाडीच्या प्रमुखपदी निवड जाहीर करण्यात आली.