<
जळगाव: 24 -केसीई सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मू. जे महाविद्यालयातील रसायन शास्त्र प्रशाळेतर्फे बुधवार 26 रोजी “चॅलेंजेस इन इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स आणि पॅटर्न सिस्टम 2020” या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य डॉ. एस एन भारंबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या चर्चासत्रात विद्यार्थी शिक्षक संशोधक विद्यार्थी यांचा सहभाग असतील. यावेळी क.ब. चौ. उ. म.वी , जळगाव येथील डॉ. भूषण चौधरी व डॉ.विकास गीते यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.या चर्चासत्रासाठी विभाग प्रमुख आर. एम. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक डॉ. राहुल महिरे व सचिव डॉ. वसीम शेख तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जबाबदारी पाहत आहेत.