<
जळगाव : येथील आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे महाशिवरात्रीनिमित्त “शिव-पार्वती” विवाहाचा सजीव देखावा आणि भक्तिगीते सादर करण्यात आली. प्रसंगी शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देत कार्यक्रमाचा आनंद लुटला.
सुरुवातीला भगवान शिवशंकराची वरात काढण्यात आली. रोटरी क्लब, मायादेवी नगर येथे हा कार्यक्रम झाला. वरातीत शिवपार्वती आणि नंदी, इतर गण तसेच सरस्वती, लक्ष्मी, विष्णू, ब्रम्हदेव यांचा देखावा लक्ष वेधून घेत होता. या वरातीत २० मुला-मुलींनी सहभाग घेत शिवशंकराची भक्ती जागविली. भगवान शंकराच्या विविध गीतावर आणि भजनांवर मंडळाच्या सदस्यांनी नृत्य सादर केले.रानी लाहोटी यानी झांकी सादर केली,
प्रसंगी शिवलीलामृत, शिवस्तुती पठण करण्यात आले. भगवान शिव यांची वेशभूषा वैष्णवी लाठी यांनी तर पार्वतीची वेशभूषा लेषा छापरवाल यांनी केली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्षा मनीषा तोतला, सचिव अमिता सोमाणी, प्रकल्पप्रमुख सुषमा मणियार, स्वाती लाठी, सोनाली काबरा, सुनिता मणियार, , सुरेखा मन्डोरा, दुर्गा मंडोरा, शोभा राठी, लतिका मंत्री, सुचिता लढढा,यांनी मेहनत घेतली , प्रिया दहाड़ ,पवित्र मंत्री, वरद जाखेटे, श्रेयस कोगटा, अनुज दहाड, आयुष दहाड, ईशान मन्डोरा, कौशल काबरा, नील काबरा, कुशल तोष्णीवाल, निशिता झंवर, भूमी छापरवाल, जुही काबरा, काव्या जाखेटे, श्रेया मंडोरा आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमा साठि मंडलाच्या संस्थापिका शीतल मंत्री,माजी अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आणि १२५ सदस्य उपस्तित होते