Sunday, July 6, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत हिंगोणेसह कराडीला आधार प्रमाणिकरणाचा शुभारंभ

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत हिंगोणेसह कराडीला आधार प्रमाणिकरणाचा शुभारंभ

जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत आज हिंगोणे (ता. यावल, जि. जळगाव), कराडी (ता. पारोळा, जि. जळगावर) येथे शेतकरी आधार प्रमाणिकरणाची चाचणी घेण्यात आली.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत यावल तालुक्यातील हिंगोणे येथे पात्र लाभार्थ्यांची संख्या 138 असून 120 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्यात आली आहे. शुभारंभाच्यावेळी प्रमाणिकरण पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 42 एवढी आहे. आधार प्रमाणिकरणाच्या शुभारंभावेळी यावलचे सहाय्यक निबंधक किशोर पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी विनोद देशमुख, क्षेत्रीय अधिकारी पी. डी. पाटील, हिंगोणे विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे सचिव विजयसिंग पाटील उपस्थित होते. यावेळी वासुदेव सुधाकर वरके, लक्ष्मण हरी भोळे, सत्यभामा शलिक भालेराव यांना आधार प्रमाणिकरण प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

कराडी, ता. पारोळा येथेही आधार प्रमाणिकरण चाचणीचा कार्यक्रम झाला. तहसीलदार अनिल गवांदे, सहाय्यक निबंधक गुलाब पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी सुभाष पाटील, लेखापरीक्षक योगेश पाटील, विलास सोनवणे, सहकार अधिकारी सुनील पाटील, गटसचिव मधुकर संपत पाटील आदी उपस्थित होते. कराडी येथील 82 पात्र लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. यापैकी 10 शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया शुभारंभावेळी पूर्णत्वास आली आहे. या योजनेंतर्गत जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 1 लाख 51 हजार 201 पात्र शेतकऱ्यांचे खाते आहेत. त्यापैकी पोर्टलवर अपलोड केलेल्या कर्ज खात्यांची संख्या 1 लाख 49 हजार 707 एवढी असून अपलोड केलेल्या कर्जखात्यांपैकी यशस्वीरित्या पोर्टलवर सबमिट झालेल्या कर्ज खात्यांची संख्या 1 लाख 49 हजार 707 असल्याची माहिती उपनिबंधक सहकारी संस्था श्री. मेघराज राठोड यांनी दिली. याशिवाय जिल्ह्यातील 2 लाख 10 हजार 677 शेतकऱ्यांचे कर्ज खाते आधार क्रमांकाशी संलग्न झाल्याची माहितीही त्यांनी दिली. 

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार प्रमाणिकरण चाचणीचा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी वेळोवेळी आढावा घेतला. त्यांनी सांगितले, या दोन गावातील आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेस दिल्या. तसेच त्यांनी सहकार विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी लोकप्रतिनिधी, शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...

Previous Post

आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे महाशिवरात्रीनिमित्त “शिव-पार्वती” विवाहाचा सजीव देखावा व भक्तिगीते सादर

Next Post

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

Next Post
जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रकटले चिमुकले विठ्ठल

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात योग दिन संपन्न

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना प्रशिक्षण;उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया चोपडा शाखेच्या वतीने तसेच चोपडा सामान्य रुग्णालय चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर

प्रा. डॉ. उमेश वाणी यांची मध्यप्रदेश मधील केंद्रीय अभ्यासमंडळावर नियुक्ती;महाराष्ट्र मध्यप्रदेश सह पाचव्या विद्यापीठात वर्णी

प्रा. डॉ. उमेश वाणी यांची मध्यप्रदेश मधील केंद्रीय अभ्यासमंडळावर नियुक्ती;महाराष्ट्र मध्यप्रदेश सह पाचव्या विद्यापीठात वर्णी

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications