<
नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत– जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे
जळगाव, दि. 24 :- ग्रामपंचायत पासून महानगरपालिका तसेच राज्य शासनाच्या विविध शासकीय कार्यलयांमार्फत नागरिकांकडून विविध प्रकारच्या कर आकारणी केली जाते. प्रशासनात काम करताना प्रत्येक शासकीय, निमशासकीय अधिकारी तसेच कर्मचारी तो आपल्या कामाचा एक भाग म्हणून काम करत असतात प्रशासनातील सर्वच घटकांनी शासनाचा महसूल गोळा करताना करदाते नागरिक हे आपले ग्राहक आहेत याउद्देशाने त्यांच्या मुलभूत हक्काला प्राधान्य द्यावे व आपले कर्तव्य व जबाबदारीची योग्य प्रकारे सांगण घालावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत उपस्थित शासकीय व अशासकीय सदस्यांना उद्देशून केले.
याप्रसंगी शासकीय सदस्य म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी बी. ए. बोटे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त यो. को. बेंडकुळे, वैधमापन शास्त्र विभागाचे स.म.बांगर, दूरसंचार विभागाचे व्ही.एस.महाजन, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी एस. आर. पाटील, महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी विकास पाटील यांचेसह अशासकीय सदस्य म्हणून सदस्य राज्य ग्राहक संरक्षण परिषद मंत्रालय, मुंबई विकास उमराव महाजन, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य/ सदस्या सर्वश्री / श्रीमती सौ.पल्लवी पुरूजित चौधरी, ॲङमंजुळा कचरुलाल मुंदडा, साहित्यीक अ. फा. भालेराव, बाळकृष्ण गंगाधर वाणी, शिवाजीराव अहिरराव, सतिष दगडू देशमुख, सुरेश परशराम रोकडे, नरेंद्र बाळू पाटील आदि अधिकारी, कर्मचारी तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, शहरात तसेच जिल्ह्यात अनोंदणीकृत अनेक रिक्षा आढळून येतात. त्यांचेवर कारवाई सुरु असून आतापर्यत परिवहन विभागाने अशा रिक्षांवर कारवाई केल्याची माहिती सहाय्यक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी बैठकीत दिली. तसेच ज्या रिक्षांची नोंदणी केलेली नाही अशा रिक्षा तातडीने स्क्रॅप करण्यात येत असल्याचेही बैठकीत सांगितले. अनेक रिक्षाचालक परवानगीपेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांची वाहतुक करतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नागरीकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविताना तसेच जे रिक्षाचालक नियमांचे पालन करतात. त्यांच्या रिक्षातून पाठवावे. अथवा शाळेच्या स्कुल बसमधूनच पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी बैठकीत करून परिवहन विभागाने अनधिकृत वाहतुकीला आळा घालण्यासाठी नागरिकांची मदत घ्यावी. त्यासाठी अवाजवी प्रवासी किंवा विद्यार्थी वाहतूक करणारे वाहनाचे नागरिकांनी छायाचित्र काढून ते वाहतूक शाखेच्या पोलीस विभाग किंवा परिवहन विभागाकडे पाठविल्यास संबंधित विभागांनी त्याआधारे संबंधित वाहनांवर तात्काळ कारवाई करावी अशा सुचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
नगरपालिका, महानगरपालिका प्रशासनांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील उघड्यावर अन्न पदार्थ विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी यावेळी दिल्यात. बैठकीत सुवर्णमहोत्सवी शिष्यवृती योजनेंतर्गत मिळणाऱ्या शिष्यवृत्तीचे अदागिरी तात्काळ होण्यास येणाऱ्या अडचणी तसेच मुद्रालोन विषयक तक्रारी ऐकून घेवून त्यावर तात्काळ मार्ग काढण्याच्या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या.