<
जळगाव.दि.24:- भारतीय सशस्त्र सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Service Selection Board (SSB) या परीक्षेची पुर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी 17 ते 26 मार्च 2020 दरम्यान प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी होण्यासाठी संधी चा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात 4 मार्च 2020 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्याआधी Facebook पेजवर Department if Sainik Welfare[Pune (DSW) वर सर्च करून त्यामधील SSB-53 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांच प्रिन्ट घेवून व ते पुर्ण भरून सोबत घेवून यावे.
छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेशासाठी कंबाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेश पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे किंवा एनसीसी C सर्टिफिकेट A किंवा B ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टर एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी किंवा टेक्नॉलॉजी ग्रॅज्यूएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे किंवा University Entry Scheme साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे, यापैकी एक पात्रता आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक या कार्यालयाच्या 0253-2451031 आणि 0253-2451032 या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.