<
जळगाव, दि.२४ – परमेश्वराच्या भक्तांनी कधीही दुःखी होऊ नये. दुःखी झाले तरी त्याचे निवारण परमेश्वर करतो. आपल्यावर कधीही दुःख आल्यास इतरांना नका सांगू देवाला सांगा तो ते दूर करतो. कर्माची गती फार मोठी आहे परंतु तिला दूर करणारा देखील परमेश्वर आहे असा उपदेश श्रध्देय गोपाल चैतन्यजी महाराज यांनी भाविकांना दिला.येथील शिवतीर्थ मैदानावर आमदार राजुमामा भोळे, श्री रामदेवजी बाबा सत्संग समिति आणि चैतन्य साधक परिवार समितितर्फे आयोजित सात दिवसीय भगवान श्री रामदेवजी बाबा कथामृत सत्संगच्या दुसऱ्या दिवशीचे निरूपण करताना ते बोलत होते.श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांनी पतिव्रता स्त्री एका मुलासाठी वाट बघते आणि एक विधवा स्त्री अशी आहे जी मुलाला जन्म देते. यावर आपण चिंतन करू शकता परंतु देवाला तुम्ही दोष देऊ शकत नाही. हे ज्याच्या त्याच्या कर्माचे भोग आहे हे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले.श्री गोपाल चैतन्यजी महाराज पुढे म्हणाले की, प्रेम परीक्षा असते. आपण जे म्हणतो की मी त्याच्यावर प्रेम करतो. तर ते प्रेम नाही मोह आहे. राग करा पण गोडपणे देवावर करा. जे देवाचे शाश्वत भक्त असतात ते इतरांना मुर्खच वाटतात. जो देवाचा शोध घेईल त्याला ते भेटतील. जो शोधणार नाही त्याला ते भेटणार नाही. श्रद्धावानसाठी देव आहेत आणि नास्तिकसाठी नाही, असे ते म्हणाले.
सजीव आरासने वेधले लक्ष
भगवान विरमदेव पाळण्यात झोपलेले असताना देवाचे अजमलजी यांच्या घरी त्यांचे आगमन होते. देव स्वतः विरमदेव इतके लहान झाले आणि पाळण्यात झोपले. अजमलजी महाराज आले त्यांनी पाहिले की पाळण्यात दोन मुले आहेत तेव्हा त्यांना समजले की देवाने आपल्या घरी अवतार घेतला. ईश्वर अवताराची सजीव आरास कथेप्रसंगी साकारण्यात आली. सजीव आरासने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. भजन सुरू असल्याने भाविक देखील नृत्यात तल्लीन झाले होते.