Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

महाआघाडी सरकारच्या विरोधात जामनेर तहसील कार्यालयात भाजपचे धरणे आंदोलन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
25/02/2020
in राजकारण
Reading Time: 1 min read
महाआघाडी सरकारच्या विरोधात जामनेर तहसील कार्यालयात भाजपचे धरणे आंदोलन

जामनेर :  उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हेक्टरी पंचवीस हजार रुपये व फळबागांसाठी पन्नास हजार रुपये देण्याच्या आश्वासनाचा विसर पडला का? असा सवाल करत जामनेर भाजपच्या वतीने सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, महिलांवरील वाढते अत्याचार यासह विविध मागण्यांसाठी भाजपने आज जामनेर तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडले. यावेळी सरकारविरोधी घोषणा देत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला. आघाडी सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून विरोधकांनी सरकारला विविध मुद्यांवरून कोंडीत पकडले आहे. शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई, सरकट कर्जमाफी, महिलांवरील वाढते अत्याचार यावरून विरोधक आक्रमक झाले असताना राज्यभरात देखील भाजपने सरकार विरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे. जामनेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुख्यंमत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधतांना त्यांना शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडल्याचा टोला लगावला आहे. नागपूर येथे या सरकारने कर्जमाफीची घोषणा केली होती; मात्र त्याचा लाभ अजूनही मिळालेला नाही. सातबारा कोरा करण्याचे आश्वासनदेखील या राज्य सरकारने पाळले नाही. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं होते, ती मदतही अद्याप मिळालेली नाही.असा आरोप करत भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुखांनाही धारेवर धरले. सरकारने दुटप्पी भूमिका सोडून शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय द्यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.  सदर आंदोलन माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली  जामनेर नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांच्या नेतृत्वाखाली  आंदोलन करण्यात आलेे यावेळी गोविंदराव अग्रवाल चंद्रकांत पाटीलदिलीप खोडपे सर महेंद्र बाविस्कर प्राध्यापक शरद पाटील कविता देशमुख रमेश नाईक आदींनी शासनाच्या नाकर्तेपणावर हल्ला चढवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र झाल्टे यांनी केले यावेळी जे.के. चव्हाण जामनेर पंचायत समिती सभापती सुनंदा पाटील उपसभापती एकनाथ लोखंडे शेख अनिस शेख बिस्मिल्ला अतिश झाल्टे विजया धुमाळ समाधान पाटील शिवाजी नाना सोनार संगीता पाटील जितेश साठे गोविंदराव अग्रवाल तुकाराम निकम छगन झाल्टे प्रयाग कोळी राजेंद्र चौधरी आनंदा लव्हारे गोपाल नाईक बबलू भंसाली राजेश पाटील अमर पाटील उल्हास पाटील विद्या खोडपे शांताराम जाधव लक्ष्मण गोरे तालुका भरातील पदाधिकारी जामनेर नगर पालिका सर्व नगरसेवक पंचायत समिती सर्व सदस्य जि प सदस्य सरपंच आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कै.अजय पाटील यांच्या पुण्यस्मरणा निमित्त अनाथ गतिमंद मुलांसाठी अन्नदान व मिठाई वाटप

Next Post

जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना कांताई जैन-साहित्य कला जीवन गौरव पुरस्कार, बालकवी ठोमरे, बहिणाबाई व ना. धों महानोर पुरस्काराचेही थाटात वितरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo