<
”सकल समाजाचा घेऊन हातात हात ,घडवू एकजुटता खेळातुन आज ” हे ब्रीद घेवून सामाजिक व क्रीड़ाविषयक कार्य करणाऱ्या येथील लेवा पाटीदार सोशल &स्पोर्ट्स फ़ाउंडेशनच्या वतीने युवा वर्गातील सर्व क्रिकेटप्रेमींना खेळण्यासाठी जिल्ह्यातून एका मंचावर आणत त्यांना पुढे जिल्हा , राज्य तसेच वरिष्ठ स्तरावर नेण्यासाठी प्रोत्साहित करणे या उद्देशाने दिनांक २७ फेब्रुवारी ते १ मार्च २०२० या कालावधीत ”एल .पी. प्रीमियर क्रिकेट लीग ” क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. शहरातील सागर पार्क, बै.निकम चौक येथे सकाळी ७-०० ते रात्री १० या वेळात होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन दि. २७ रोजी सकाळी ७–३० वाजता हॉटेल सिल्व्हर पॅलेसचे संचालक मा. श्री. सागर भागवत भंगाळेयांच्या शुभहस्ते होणार असुन स्टार फेब्रिकेशन जळगावचे श्री रविंद्र मुरलीधर अत्तरदे ,एबीएस फिटनेस जिमचे श्री संदीप एन. पाटिल ,रुखमा टेन्ट हाऊसचे श्री किशोर डि. महाजन तसेच मा. श्री. विशाल सुरेश भोळे यांची प्रमुख उपस्थिति राहणार आहे. सदर स्पर्धेत सिद्धी ऑटोमोबाइल्स, प्लँटो कृषीतंत्र ,शिवम हॉस्पिटल ,नॉर्थर्न हॉस्पिटल ,अत्रेय इंटरप्राइजेस ,तुलसी जेली स्वीट्स, अतुलभाऊ वायकोळे वॅरियर्स ,धनंजय ऍग्रो पॉवर ,जयदुर्गा ग्रुप , अस्मी कन्स्ट्रक्शन , सोयो सिस्टिम्स ,सोनी एजन्सीज , ओम बिल्डकॉर्प , श्रीकाशी अर्थ वर्क्स ,पंकज टिव्हीएस , त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन इत्यादी नामांकित प्रतिष्ठानांच्या १६ संघांनी सहभाग नोंदविला असुन एकूण ३१ सामने खेळले जाणार आहेत. या एल.पी. प्रीमियर क्रिकेट लीगचे निमित्ताने माधवराव गोलवलकर रक्तपेढी व लेवा पाटीदार सोशल & स्पोर्ट्स फ़ाउंडेशनच्या संयुक्त सहकार्याने सागर पार्क येथेच २७ ते १ मार्च हे ४ दिवस दुपारी ४-०० ते रात्री ९–०० या वेळेत रक्तदान शिबिरदेखील आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी मा. आमदार राजुमामा भोळे यांचे अनमोल मार्गदर्शन व सहकार्य असुन मुख्य प्रायोजकत्व हॉटेल सिल्व्हर पॅलेस तर सहप्रयोजकत्वाची जबाबदारी स्टार फेब्रीकेटर्स यांनी सांभाळलेली आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अभिजीत महाजन,अमोल धांडे ,सिंचन सरोदे ,चंदन कोल्हे, भूषण बढे हितेंद्र धांडे, स्वप्निल नेमाडे , प्रवीण चौधरी , लीलाधर खडके , शक्ति महाजन , अक्षय कोल्हे , बंटी भारंबे इत्यादि परिश्रम घेत आहेत. क्रिकेटप्रेमी व शहरवासियांनी मोठ्या संख्येने या सामन्यांचा आनंद घ्यावा असे आवाहन संचालकांनी केले आहे.