<
जळगाव- येथील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना 15 ऑगस्ट 2018 या वर्षाचा शासनाकडून गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक राज्यपाल भगतसिह कोश्यारी याच्या हस्ते प्रदान करण्यात आल्याने डॉ.पंजाबराव उगले यांचा सत्कार दि.25 रोजी संविधानची प्रतिमा व शाल देऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सपकाळे,कार्यध्यक्ष शरदराव कुळकर्णी, विभागीय सचिव इम्रान शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष नरेश बागडे, दिपक सपकाळे, महिला जिल्हाध्यक्ष नाजनीन शेख, ,चेतन निबोळकर, मुकेश जोशी, सुनील भोळे,रितेश माळी,संजय तांबे,आदी पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी सत्कार प्रसंगी चर्चा करतांना संगितले की, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेतर्फे 1000 गरजू विद्यार्थाना शालेय साहित्य वाटप 500 पत्रकारांना हेल्मेट वाटप यासह विविध उपक्रम राबवित असल्याने खरच पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद आहे,तसेच सध्या कंजरभाट समाजामध्ये सुरु असलेल्या चर्चाबाबत लवकरच जिल्हा पोलीस प्रशासनतर्फे कंजर वाडा येथे संवाद साधून कायद्याबाबत प्रबोधन करण्यात येणार असून लवकरच बेठक घेण्यात येणार असल्याचे श्री डॉ.उगले यांनी चर्चेप्रसगी व्यक्त केले. शेवटी शरदराव कुळकर्णी यांनी आभार मानले.