<
खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘नँनोटेक्नाँलोजी अँड अमाँरफस मटेरिअल्स् : सिंथेसिस,कॅरँकटेरायझेशन अँड अप्लीकेशन’ या विषयावरची राष्ट्रीय पातळीवरील “नाम-रमण:२०२०” ही परिषद २८ व २९ फेब्रुवारी रोजी – भौतिकविज्ञान प्रशाळेतर्फे आयोजित करण्यात आली आहे.
या परिषदेसाठी खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे प्रेरणास्थान प्रज्ञावंत .नंद्कुमार बेंडाळे तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.पी .पी. पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले आहे .परिषदेचे उदघाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डाँ.पी.पी.माहुलीकर यांचे हस्ते .२८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
या परिषदेसाठी प्रो.अशोक जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ते अमेरिकास्थित मायक्रोलीन एल्.एल्.सी. या इलेक्ट्रीकल साधने व बँटरीज निर्माण करणाऱ्या नामांकित कंपनित अध्यक्ष आहेत.
या परिषदेसाठी आदरणीय अतिथी म्हणून सी-मेटचे माजी संचालक डाँ.डी.पी.अमळनेरकर उपस्थित राहणार आहेत.परिषदेसाठी संशोधकांचा भरपूर प्रतिसाद मिळत असून अनेक शोधनिबंध प्राप्त झाले आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रो.एम.ए.मोरे व प्रो.संजय ढोले, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील प्रो. राजाराम माने तसेच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रो.बी.एल.चौधरी यांच्या विशेष व्याख्यानांचा बौध्दिक आनंदही या निमित्ताने शिक्षक व विद्यार्थ्यांना उपभोगता येणार आहे.
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरमण यांच्या सन्मानार्थ भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.याच तारखेला डॉ.रमण यांनी त्यांचा शोधनिबंध “नेचर”या मासिकाला प्रसिद्धीसाठी पाठविला होता.त्यांच्या “रमण परिमाण”(प्रकाशाचे माँलिक़ुलर स्कँटरिंग) या शोधासाठी ते ओळखले जातात. डॉ.रमण यांना १९३० चे भौतिकशास्त्र या विषयासाठीचे नोबेल पारितोषिक याच संशोधनासाठी मिळाले होते.या दिवसाचे औचित्य साधून परिषदेच्याच पहिल्याच दिवशी मू.जे.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी “रमण इफेक्ट” या विषयावर पोस्टर स्पर्धा सुद्धा आयोजित केलेली आहे. साधारण ५० विद्यार्थी या स्पर्धेत आपापल्या पोस्टर सह सहभाग नोंदविणार आहेत.
वरील दोन्ही कार्यक्रमांसाठी या परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य प्रो.डॉ.सं.ना.भारंबे व मुख्य सल्लागार माजी प्राचार्य डॉ.एल.ए.पाटील यांच्या सहकार्याने संयोजक डॉ.के.बी.महाजन व आयोजन सचिव डॉ.व्ही.आर.खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्र विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आयोजन करीत आहेत.