<
केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प. वी .पाटील विद्यालय तसेच केसीई सोसायटीचे मदर तेरेसा हेल्थ केअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. संस्थेमार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी ही केली जाते याप्रमाणे यावर्षी सुद्धा शाळेच्या एकूण सातशे विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी संस्थेच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लीना चौधरी यांच्या मार्फत करण्यात आली.
दात ,कान-नाक-घसा, पोट , डोळे इत्यादी अवयवांची या मध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना पाहण्यात, ऐकण्यात , बोलण्यात काही अडचणी होत्या अशा विद्यार्थ्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी सल्ला देण्यात आला.
वैद्यकीय तपासणी चे आयोजन मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी केले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम