<
जळगाव(प्रतिनिधी):- दैनंदिन जीवनात घरगुती वापरात,छोट्या मोठ्या आजारावर विविध औषधी वनस्पती वापरात येत असतात. त्यांची माहीती विद्यार्थाना व्हावी या उद्देशाने प्रगती विद्यामंदिर शाळेतील शिक्षक मनोज भालेराव यांनी विद्यार्थ्यांचा ओळख औषधी वनस्पतिची हा उपक्रम घेतला. या उपक्रमात त्यानी अडुळसा, बेल, कडुनिंब, सदाफूली, दालचीनी, सिंकोना, अश्वगंधा, शतावरी, आवळा, हीरडा, बेहड़ा तुळस अशा औषधी वनस्पतींची ओळख करून दिली तसेच त्यांचा खोकला,कफ,सर्दी,ताप,अतिसार,मळमळ,मलेरिया यांवर होणारा उपयोग सांगितला.वनस्पतींची ओळख करून देत असताना विद्यार्थी स्वत: औषधीचा घरामध्ये होणारा वापर याबद्दल सांगत होते. या उपक्रमाद्वारे विद्यार्थानी ज्या औषधी वनस्पतींची फक्त नाव ऐकलेली होती त्यांना त्यानी प्रत्यक्ष अनुभवातून बघितले.