<
जामनेर-(अभिमान झाल्टे) – सध्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आपल्या पाल्यांच्या शिक्षण देण्याकडे पालकांचा कल असतो मात्र स्वातंत्र्यपूर्व काळापासून विद्यार्थ्यांना ज्ञान दानाचे कार्य करणाऱ्या , त्यांच्यावर संस्कार घडवणाऱ्या शाळा ग्रामीण भागातही आपले अस्तित्व टिकून ठेवत आहेत अशास केकत निंभोरा येथील जि प शाळेला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र वितरण करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जि प सदस्य सो प्रमिलाताई पाटील यांनी भूषविले आपल्या भाषणातून त्यांनी महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला याप्रसंगी माजी जि प अध्यक्ष श्री दिलीप खोडपे सर यांनी शिक्षक पालक व ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नातून विद्यार्थ्यांचे भावविश्व फुलविले असा विचार मांडला त्याप्रसंगी शिक्षणाधिकारी सरोदे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी काळे साहेब,दुसाने साहेब, नगरपरिषद गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे , पंचायत समिती सभापती सुनंदाताई पाटील, पंचायत समितीचे गटनेते अमरभाऊ पाटील, माजी सभापती बाबुराव गवळी, भाजपा सरचिटणीस सविताताई भोंडे, सरपंच हर्षदा ताई पाटील, नाना राजमल पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष अभय भाऊ हिवरे ,पोलीस पाटील , डॉ सागर पंडित, सामाजिक कार्यकर्ते दशरथ पाटील, अशोक पाटील मनसे, जितु पाटील, सर्व रामराज्य ग्रुप पालक व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून , जि प शाळा हिवरखेडा बुद्रुक व जि प शाळा उन्नती नगर येथील सदस्य समिती सदस्य यांची उपस्थिती होती. तसेच शाळेच्या चिमुकल्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले , ज्यांनी शाळेसाठी ISO मिळवण्यासाठी प्रयत्नशील असे कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील सर यांनी केले.ISO नामांकन संस्थेचे मुंबई येथील मुख्याधिकारी डॉक्टर संजय कदम यांच्या हस्ते नामांकन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले या कार्यक्रमात हिवरखेडा बुद्रुक व उन्नती नगर या शाळांनाही आय एस ओ नामांकन वितरीत केले गेले.
आमच्या शाळेत ग्रेडेड मुख्याध्यापक रिक्त आहे तसेच माझ्याकडे वर्ग व मुख्याध्यापक पदाचा कारभारी आहे . या ठिकाणी आम्ही सर्व महिला शिक्षक आहोत विद्यार्थी ,समिती अध्यक्ष, सदस्य व राम राज्य ग्रुप चे सदस्य यांच्या प्रमाणिक व उत्कर्ष प्रयत्नांमुळे आज या सन्मान पात्र ठरलो असे भिरूड मॅडम यांनी आपल्या मनोगतातून सांगितले मोरे मॅडम व पांगुळ सर यांनी मनोगत व्यक्त केले , या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा चौधरी यांनी केले तर कीर्ती महाजन यांनी आभार मानले , कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा चौधरी आशा पालवे ,हर्षा सूर्यवंशी, सविता पाटील, ठाकरे सर, साठे सर, या सर्वांनी मिळून परिश्रम घेण्यात आले.