<
जळगांव(प्रतिनीधी)- नोट्स पध्दतीने स्त्रीरोग विषयक ऑपरेशनची सुरुवात तैवान, बेल्जियम व कोरिया या देशांमध्ये सुरु झाली होती. या नवीन पध्दतीच्या ऑपरेशनमध्ये पोटावर एकही इजा अथवा चिरा न करता हे ऑपरेशन दुर्बिनीद्वारे करण्यात येतात. या पध्दतीने हे ऑपरेशन भारतात पहिल्यांदाच करण्यात आले आहे.
या विशिष्ट पध्दतीला नोट्स ( Natural Orifice Transluaminal Endoscopic Surgery) असे म्हणतात. साधारण दुर्बिणीच्या ऑपरेशनमध्ये किंवा कोणत्याही स्त्रिरोग विषयक ऑपरेशनमध्ये पोटाला चिरा देवून ऑपरेशन करावं लागतं व त्यानंतर टाके घातले जातात. नोट्स पध्दतीच्या ऑपरेशनमध्ये शरिरात असलेल्या नैसर्गिक प्रवेश मार्गाचा उपयोग करुन ऑपरेशन केले जाते. आतापर्यंत नोट्स पध्दतीने जनरल सर्जरीचे ऑपरेशन भारतातल्या बर्याच मोठ्या शहरात करण्यात आलेले आहे. दिल्ली येथील एका मेडीकल कॉन्फरन्समध्ये असतांना तैवान येथील डॉक्टरांशी संबंधित विषयावर प्रदिर्घ चर्चा केल्यानंतर डॉ. सुयश नवाल यांना प्रेरणा मिळाली. त्यानंतर त्यांनी या विषयाचा अभ्यास केला. यातंत्रातील त्रुटी काढून हे नविन तंत्र विकसित केले आहे. स्त्रीरोग विषयक नोट्स पध्दतीने ऑपरेशन करुन गाठी व गर्भाशय काढणे इ. हे भारतात पहिल्यांदाच २३ मार्च २०१९ रोजी नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमने केले आहे. या टीममध्ये डॉ. सुयश नवाल, डॉ. सुदर्शन नवाल, डॉ.ऋचा नवाल, डॉ. जयश्री राणे व नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ओ.टी. टीम यांचा समावेश होता.
युएसमधील अमेरिकन असोसिएशन ऑफ गायनेकॉलॉजिकल लॅप्रोस्कॉपिस्ट चे ऑफिशियल जर्नल असलेल्या जर्नल ऑफ मिनीमली इन्वेसिव्ह गायनेकॉलॉजी या नामांकित जर्नलमध्ये नवाल मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटलमध्ये झालेल्या नोट्स या शस्त्रक्रियेसंदर्भातील रिसर्च पेपर सादर करण्यात आलेला आहे. तसेच नोव्हेंबर २०१९ मध्ये कॅनडा येथे पार पडलेल्या ४८ व्या ग्लोबल एएजीएल काँग्रेस मध्ये डॉ. सुयश नवाल यांचे नोट्स शस्त्रक्रियेवरील सादरीकरण झाले. नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी भारतातील स्त्रियांसाठी विना टाक्याची व चिरा न देता होणारी शस्त्रक्रिया करुन जळगांवचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले.
१८ऑगस्ट २०१९ ला नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे Life Scope Notes Center चे थाटात उद्घाटन झाले. स्त्री विषयक Notes Surgery साठी हे भारतातील पहिले सेंटर आहे. या अभूतपूर्व यशानंतर दिनांक १३ सप्टेंबर २०१९ रोजी या पध्दतीने यशस्विरित्या शस्त्रक्रिया करत २. ४६५ कि.ग्रॅ.चे ३८ वर्षीय महिलेचे गर्भाशय काढण्यात आले. या नवतंत्रज्ञानातील कामगिरीमुळे वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाच्या वतीने डॉ. सुयश नवाल यांना वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे संपादक पवन सोलंकी यांच्या हस्ते २५ ऑक्टोबर २०१, रोजी सन्मानपत्र, गोल्डमेडल व ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. यापध्दतीने स्त्रीविषयक पोटांच्या समस्यांवर विना टाके घालता दुर्बिणीद्वारे हे ऑपरेशन जळगांवातील एम.जे. कॉलेज रोड, भास्कर मार्केट समोर स्थीत नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ङळषश डलेशि छेींशी उशपींशी येथे केले जात आहे. ही समस्त देशवासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये नोट्स सर्जरीवर अमरावती येथे सर्व स्त्रीरोग तज्ञ यांनी मार्गदर्शन केले. तर मे २०२० मध्ये भारतातील कलकत्ता, चेन्नई, व परदेशातील रोम येथे जावून नोट्स संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. सुयश यांनी या असामान्य कामगिरीनंतर भविष्यातही जोवून नोट्स संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. सुयश यांनी या असामान्य कामगिरीनंतर भविष्यातही जोवून नोट्स संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. सुयश यांनी या असामान्य कामगिरीनंतर भविष्यातही अत्याधुनिक व संशोधनात्मक उपचार पध्दती व सेवा-सुविधा रुग्णसेवेत उपलब्ध करुन देण्याचे ठरवले आहे.
नोट्स पध्दतीच्या ऑपरेशनमुळे मूळ फायदे-
१) पोटावरील एकही चिरा न देता दुर्बिनीद्वारे हे ऑपरेशन केले जाते त्यामुळे शरीरावर कुठलाही व्रण राहत नाही. २) सर्वसामान्य पध्दतीने ऑपरेशन केल्यानंतर होणार्या शारीरिक त्रासातून मुक्तता होते. ३) रिकव्हरी लवकर होत असल्यामुळे पेशंटला हॉस्पिटलमध्ये कमी वेळ अॅडमीट रहावं लागतं.