<
जळगाव : येथील अण्णासाहेब डॉ. जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात “उडान:संजीवनी- नव उद्योजकांसाठी” या विशेष उपक्रमाचे आयोजन दि. २८ फेब्रुवारी रोजी सरस्वती लेवा बोर्डिंग सभागृहात करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील कौशल्यप्राप्त व नव उद्योजकतेकडे झेप घेणाऱ्या होतकरू विद्यार्थीनीना वस्तुरूपी भाग भांडवलाचे सहाय्य केले जाते. यामुळे विद्यार्थिनी आर्थिक स्वावलंबी होऊन यशस्वी उद्योजक होतील. महाविद्यालयातून विद्यार्थीनीना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्यासाठी उडान हा प्रकल्प महाविद्यालयाने हाती घेतला आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. यावेळी विद्यार्थीनीना वस्तू वितरण खा.सुप्रिया सुळे यांचे हस्ते वितरीत होणार आहे. प्रसंगी लेवा एज्युकेशन युनियनचे अध्यक्ष आणि विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुभाष चौधरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील.
कार्यक्रमात फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रमाच्या ५ तर ब्युटी थेरपी अभ्यासक्रमाच्या ९ विद्यार्थीनीना हाय स्पीड शिलाई, पिको मशीन आणि पार्लरचे साहित्य वितरीत करण्यात येणार आहे. विद्यार्थीनीना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन प्राचार्य डॉ.एस.एस.राणे यांनी केले आहे.