मराठी आता ना रहीली
केवळ मराठ्यांची माऊली
कर्तुत्व तीचे थोर
देते जगाले सावली ।।१।।
मराठी ची मोठी शान
नासाने अंतराळी पाठवून
केला तिचा सन्मान
उंचावली मराठी ची मान ।।२।।
मायबोली जशी गावरानी तूप
जिव्हेवर बसली सरस्वती च रुप
माय मराठीच पिऊन दूध
लेकरं झाली प्रतिभावान खूप ।।३।।
जगाले कयाले गूण महान
देऊ लागती मराठी ले मान
Google ले बी पडते मराठी शी काम
सारे जग ठोकते आता सलाम ।।४।।
_ सौ. शितल शांताराम पाटील
शेळगाव जि. जळगाव
9325533279