<
परिवर्तन आयोजित भवरलाल जैन यांना आदरांजली वाहणारा भावांजली परिवर्तन कला महोत्सवाच्या सातव्या दिवशी मराठी भाषा दिनानिमित्त पुणे येथील ऑन द टेबल क्रिएशन निर्मित ‘जातस्य हि’ या कवितेच्या अभिवाचनाच्या कार्यक्रमात तुकाराम, सदाऩद रेगे, भालचंद्र नेमाडे यांच्या कवितेचे अभिवाचन सादर करण्यात आले. यात अपूर्व साठे,गुणवर्धन सोमण, सचिन जोशी, चैतन्य आडकर, रणजित मोहिते यांनी वाचन केले.
मराठी साहित्यातील अभिजात कवितांचे उत्तम सादरीकरण व गायन सादर केले. मी मरेन तेव्हा बालकनी, मर्ढेकरकरांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा, सावनेरला निघालोय, या कविता सादर केल्या.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील गायिका ‘शबनम विरमानी या कबिराचे दोहे गाणा-या गायिका आहेत, ताल वाद्याचा वापर न करता तंबोरा, चिपळ्या व टाळ अशा अतिशय कमी वाद्यांसह कबीराचे दोहे ऐकणं हा स्वर्गीय अनुभव रसिकांना घेता आला. कबिर प्रत्यक्ष अवतरल्याची अनुभूती रसिकांना आज आली. मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी मराठीतील थोर कवींसोबत हिंदी मधील सगळ्यात मोठा कवी कबीर यांचं सादरीकरण होणं ही मराठी भाषेच्या स्विकारशीलतेचे दर्शन आज परिवर्तनने घडवलं. भाषा म्हणून समृद्ध होतांना परकीय भाषा व इतर भारतीय भाषामधील शब्द स्विकारून मराठी समृद्ध झालीय. कबीर आणि महाराष्ट्र या़चं नातं शतकांचं आहे, त्या नात्याचा बंध महोत्सवात आज गहिरा झाला. शबनम विरमानी यांनी तुकारामाचा अभंग वाचून तुकाराम आणि कबीर यांच्यातील अद्वैत समजवून सांगितले. शबनम विरमानी सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील गायिका परिवर्तनच्या महोत्सवाला एक दर्जेदार परिमाण देवून गेला दाखवला. त्यांना साथसंगत स्वागत शिवकुमार, श्रीपर्णा मित्रा, यशवंत एस . यांनी सोबत केली. हम वारी जावू रे, कार्यक्रमाला दिलीप रामू पाटील, डॉ शिल्पा बेंडाळे, प्रिती अग्रवाल, विनया जोशी व नंदू अडवाणी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी महोत्सव प्रमुख अनीलभाई कांकरिया, अनिसभाई शहा, अमरभाई कुकरेजा, नंदलाल गादिया, नारायण बाविस्कर यांनी स्वागत केले.
उद्या
‘भावरंग भक्तीचे’ हा शास्त्रीय नृत्यावर आधारित अपर्णा भट व सहकारी यांचा कार्यक्रम.
२८ फेब्रुवारी २०२० शुक्रवार
सायं – ६:३० वा
एम्फी थिएटर, भाऊंचे उद्यान जळगाव