<
जळगाव(प्रतिनिधी)- येथील अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे राज्यस्तरीय परिषद जळगाव येथे होत असून यासाठी मुबंई येथील सार्वजनिक आरोग्य विभागातील महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना महाराष्ट्र शासन मध्ये कार्यरत वित्तीय सल्लागार तथा उपसंचालक व कंजरभाट समाजात चुकीच्या बाबींविरुद्ध आवाज उठवणारे कृष्णा इन्द्रेकर हे आपल्या टीम सोबत जळगावला दिनांक २९ फेब्रुवारी शनिवारी व १ मार्च रविवारी असे दोन दिवसासाठी येत आहे. ते जळगाव येथील कंजरभाट समाजातील मानसी बागडे आत्महत्या प्रकरणी त्यांच्या नातेवाईकांची भेट घेणार आहे. तसेच पोलीस प्रशासन त्यानंतर कंजरवाडा येथील पंच मंडळी, युवा व महिला मंडळ यांच्याशी चालू घडामोडीवर व समाजात जो गैरसमज झाला आहे त्याबाबत जाखनी नगर कंजरवाडा येथे दि. २९ रोजी सायंकाळी ७ वाजता चर्चा करणार आहेत. तरी कंजरभाट समाजाच्या पंच मंडळी व युवा तसेच महिलांनी व सर्व कंजरसमाज यांनी खुलेआम चर्चेत सहभागी व्हावे असे आवाहन अरुणा इन्द्रेकर, लिलाताई इन्द्रेकर यांनी केले आहे.