<
जळगांव – एस.एस. मणियार विधी महाविद्यालयाचे कायदा प्रशिशण शिबीर कला,वाणिज्य आणि गृहविज्ञान महिला महाविद्यालय,जळगांव येथे घेण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन जळगांव जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाचे सचिव के.एच.ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर प्रा.डॉ. बी.युवाकुमार रेड्डी, महिला महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ. जयश्री नेमाडे, अॅड. रुपाली भोकरीकर डॉ.डी.आर. क्षीरसागर हे होते. कार्यक्रमास विधी चिकीत्सालयाच्या समन्वयिका डॉ. अंजली बोंदर, डॉ. रेखा पाहुजा, प्रा.जी.व्ही.धुमाळे, डॉ. योगेश महाजन, डॉ.विजेता सिंग, प्रा.ज्योती भोळे डॉ. संजय भामरे, प्रा.पाटील उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. ठोंबरे यांनी महाविद्यालयाच्या कार्याचे कौतुक करुन जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाचे कार्य व त्याचे महत्व विषद केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी साक्षरांसाठी विधीसाक्षरतेची गरज लक्षात घेऊन महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी विविध महाविद्यालयात कायदा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करत असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर अॅड. भोकरीकर यांनीही कायदा प्रशिक्षण शिबीराचे महत्व सांगून विद्यार्थ्यांच्या पथनाट्याचे कौतुक केले. प्राचार्या सौ. नेमाडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायदे,रॅगींग प्रतिबंधक तरतूदी, वृध्दांचे अधिकारी इत्यादी विषयांवर विविध पथनाट्य सादर केली. या पथनाट्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून कौटुंबिक हिंसाचार, माहितीचा अधिकार या विषयासंबंधी माहिती दिली. तत्पूर्वी डॉ. बोंदर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवृत्ती माळी या विद्यार्थ्याने केले. डॉ. संजय भामरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.