<
मुंबई – (प्रतिनीधी) – खोटे आमिष दाखवून शारीरिक संबंधासाठी सहमती मिळवणे बलात्कारच असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. प्रेमाचे आमिष दाखवून संमतीने शारीरिक संबंध प्रस्तापित करणे यामध्ये पिडितेची सहमती असल्याचे सिद्ध होत नाही. अशाप्रकारचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवणे बलात्काराच मानले जाईल, असा निकाल एका प्रकरणाच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
बलात्काराच्या आरोपातून मुक्त करण्याची मागणी करणा-या एका पुरुषाच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्या. सुनील शुकरे आणि न्या. माधव जमादार यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे.
पिडितेसोबत प्रेम संबंध असल्याच्या कारणावरुन तीच्या संहमतीने शारीरिक संबंध ठेवल्याचे याचिकाकर्त्याने याचिकेत म्हटले होते.
तर याचिकाकर्त्याने माझ्यावर जीवापाड प्रेम करत असल्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यास माझी संहमती मिळवली, असा आरोप पिडितेने याचिकेद्वारे केला आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्त्याच्या प्रेमाच्या आमिषाला बळी पडून शाररिक संबंधासाठी पिडितेची सहमती प्राप्त केली असल्याचा पिडितेच्या आरोपात तथ्य असल्याचं कोर्टाने मान्य केले. जरी पुरुषाने लग्नाबद्दल पिडितेला कोणतेही वचन दिले नाही, परंतु हे देखील खरे आहे की त्या महिलेने लग्नाआधी अशा शारीरिक संबंधास नकार दिला होता. त्यानंतर पुरुषाने तुझ्यावरच माझे जीवापाड प्रेम असून तुझ्याव्यतरिक्त माझं कोणावरही प्रेम नाही, असे सांगून शारिरिक संबंधासाठी तीची सहमती प्राप्त केली, असे यावरुन सिद्ध होते.
खंडपीठाने पुढे म्हटले आहे की, पुरुषाने दिलेलं आश्वासन स्त्रीला चुकीचा अर्थ सांगण्यासाठी पुरेशी होती. त्यामुळे याचिका कोणत्याही गुणवत्तेविना आहे आणि ती फेटाळण्यास पात्र आहे, “असे न्यायाधीशांनी सांगितले.